(१०) अडकविणारी ठरली आहे. प्रसंगवर्णनांत, व्यक्तिवर्णनात बखरकार स्वतंत्र भावना, कल्पना यांना अवसर न देतां पुराणातील प्रसगांचा आणि व्यक्तींचा निर्देश करतात, पौराणिक वर्णनांचा आश्रय घेतात, कथा संदर्भ उचलतात. तेथील दष्टांत अलंकार यांचा वापर करतात. हा सर्व पौराणिक थाट बखरींना एक निराळा ढंग प्राप्त करून देत असला पौराणिक काल आणि वातावरण यांचा भास यामुळे होत असला तरी स्वतंत्र कलाकृतींतील वर्णनांची संर या अनुकरण प्रेरित वर्णनांना येत नाहीं. एक प्रकारची सांकेतिकता, साचेबंदपणा या वर्णनाला, दृष्टांत अलंकारांना येऊ लागतो. पुराणसदृश साहित्य निर्माण करणे ही बखरकारांची भूमिका होती असे आग्रही प्रतिपादन डॉ. श्री. रं. कुलकर्णी करतात परंतु या भूमिकेमुळे बखरीतील कलात्मकतेला मर्यादा पडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलेले नाहीं. युद्धवर्णनांत राम-रावणी युद्ध, भारती युद्ध यांचे दष्टन शौर्यवर्णनांत भीमार्जुन-कर्ण यांचे निर्देश प्रथम भव्य पाश्र्वभ --> वाटले तरी त्यांची पुनरुवती त्यांतील सांकेतिकताच उघड करने, दष्टांतांतून, दाखल्यांतून बखरकारांची बहुश्रुतता प्रतिबिंबित होत असली तरी त्यांच्या कल्पनेने स्वैर भरारी न मारतां रामायण-महाभारत यांतील ठराविक उदाहरणांचा, संदभांचा वापर करण्यावरच समाधान मानणे । आजच्या कलाकृतीला थोडेसे खटकतेच. । वखरकारांनी दिलेल्या वंशावळी, सृष्टीची उपपत्ती, प्राचीन राजशाची माहिती, पुराणांच्या धर्तीवर येणारी ऐश्वर्यप्राप्तीची फलश्रुती यांचे समर्थन बखरकारांच्या पुराणोवत धर्म रक्षण प्रेरणेच्या अन्वये किंवा पराणसदश साहित्यनिर्मितीच्या अनुषंगाने केले तरी बखरीचा कलात्मक एकजिनसीपणा यामुळे बाधीत होतो हें नाकारण्यांत अर्थ नाहीं. जेथे वखरकारांच्या जीवनदृष्टांतच ही अद्भुतता, दैववाद चमत्कार यांचा प्रभाव असलेली पुराणांची विचारसरणी भिनलेली आहे. तिथे ही ही पौराणिक पद्धती सांकेतिक राहत नाही. तेथे बखरकारांच्या व्यक्तित्वाचा
पान:पाणिपतची बखर.pdf/18
Appearance