(९) हासांतील प्रसंग आधाराला घेऊन ऐतिहासिक तपशिलाची निवड करून, त्यांतील भावसत्य नेमके हेरून प्रतिभाबलाने जी निमिती ( Creation) साधतो ती कलेची अपरसृष्टी बखरीत उतरू शकत नाही असेच म्हणावे लागते. बखरकाराने भावनाकल्पना यांचे साह्य घेतले तरी प्रतिभावंताची विमितीची पातळी ती नाठू शकत नाही. । ऐतिहासिकतेचा बखरीचा पदर तिला पार्थिवाशीं अधिक प्रमाणांत जखडून ठेवतो. ऐतिहासिक कादंबरीकार याबाबत अधिक स्वातंत्र्य घेतांना दिसतो. दखरकारांची ऐतिहासिक सत्याशीं प्रामाणिक राहण्याची भूमिका या दृष्टीने विशेष विचारात घ्यावी लागते. इतिहासाचार्य राजवाडे यांनीहि बखरकारांचा हा प्रामाणिकपणाचा गुण वाखाणिला आहे परंतु यामुळे खरे पाहतां बखरकारांच्या चित्रणला बंधनच पडले आहे. ऐतिहासिक सत्यापेक्षा इतिहासांतून गवसणा-या भावसत्याला कादंबरीकार प्रमाण मानतो आणि त्या दृष्टीने थोडे स्वातंत्र्यही घेतो. ऐतिहासिक वास्तव आणि काल्पनिक यांचे मिश्रण करून या भावसत्याचा आविष्कार करणारी एकजिनसी कलाकृती निर्माण करण्याची कादंबरीकाराची धडपड असते यामुळेच कलाकृतीला सार्वकालीन असा आशय अर्थ प्राप्त होतो इतिहासाच्या तात्कालिकांतून कलेच्या शाश्वततेकडे तिची वाटचाल होते। बखरींत तत्कालीन सामाजिक जीवनाचा संदर्भ महत्त्व पावतो तर या संदर्भाला भेदून अखिल मानवी जीवनापर्यत ऐतिहासिक कलाकृती भिडते. नवनिभितीची पातळी आणि ऐतिहासिक सत्यापेक्षां भावसत्यावर भर दिल्याने लाभणारे शाश्वततेचे अधिष्ठान ही दोन वैशिष्ट्ये ऐतिहासिक कादंबरीला बखरीहून वेगळी उंची प्राप्त करून देतात. बखरीची पौराणिक पद्धति बखरकारांच्या भूमिकेत ऐतिहासिकतेला वास्तव, सत्य यांना असणारे प्राधान्य हे त्यांच्या चित्रणाला जसे बंधनकारक झाले आहे, तसेच बखरकारांची पुराणांचे अनुकरण करण्याची पद्धती ( जिला डॉ. श्री. रं, कुलकर्णी पुराणशरणता म्हणतात ) त्याच्या कल्पनाविलासाला मर्यादेत राष्ट्रीय १४॥ अथायं , यी ।
पान:पाणिपतची बखर.pdf/17
Appearance