या सर्व घटकांना एका सूत्रांत गोवणारे बखरकारांचे व्यक्तित्वही बखरीत प्रतिबिंबित होते. बखर हा जसा इतिहास नव्हे, तसेच ते विशुद्ध वाङमयही नव्हे, त्याची प्रेरणा जशी वेगळी, तसा त्याचा अवतारही आगळा. बखर सिद्ध होतांना ललित वाङमयाचे घटक आणि गुणविशेष यांना आत्मसात करते, हे तिचे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया कदाचित अजाणता होत असेल, बखरकाराच्या तळमळी पोटीच साहित्य गुण निम ण होत असतील किवा हें बखरकार कधीं जाणीवपूर्वकही साधत असेल. व वरकारांची भूमिका व कुवत यानुसार बखरीतील कलात्मकतेत तरतमभाव आढळ - णार हे तर खरेच; पण सर्वसाधारपणे बखरींतील कलात्मकता तिच्या ऐतिहासिकतेपेक्षां उठावाने दिसावी असे बखरकारांनाही वाटत असावे. याचे एक गमक म्हणजे बखर वाचन करतांना आपल्याला जो प्रत्यय येतो, त्यांत ज्ञानापेक्षां प्रक्षोभाचाच भाग अधिक असतो. बखरीपासून ज्ञानानंदापेक्षां भावनानंदच अधिक प्रमाणांत लाभत नसतो काय ? असे असले तरी बखर आणि ऐतिहासिक कादंबरी यांच्या भूमिकेत, पद्धतींत, आविष्कारांत मात्र मूलभूत फरक असतो. बखर आणि ऐतिहासिक कादंबरी बखरकार आणि कादंबरीकार याच्या भूमिकेतील मूलभूत फरक हा आहे कीं, बखरकाराची भूमिका निवेदकाची ( बृत्तांत, घटना, घडामोडी यांचे निवेदन ) असते. तर कादंबरीकाराची भूमिका नवनिर्मिती साध - णा-या कलावताची असते. भावना, कल्पना यांचा शिडकावा निवेदनांत केल्यामुळे बखरकाराला बखरींत लालित्य किंवा वाङमयीन गण आणतां येतात. निवेदन वर्णन यांतील तद्रूपता-तादात्म्य यामुळे बखरीतील सृष्टी ललित वाङमय सृष्टीशी जवळीक साधू लागते; परंतु कादंबरीकार इति
- प्रा. ग्रामोपाध्ये बखरकाना ( Unconseious Artist ) म्हणतात; ( मराठी बखर गद्य प्रस्तावना पृ. ६ ) पर तु नवनिर्मिती साधणाच्या कलावतांच्या पंक्तीत बखरकारांना बसविणे अवघड आहे.