(६) नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनी इतिहासाचे साधन म्हणून सुद्धा बखरोंना प्रमाण मानलेले नाही, त्यांतील स्थल, काल आणि व्यक्ति यांचा विपयसि, काटेकोरपणा किंवा प्रमाणबद्धतेचा अभाव, अतिशयोक्तीचे प्राबल्य या दोषामुळे त्यांना फारसे महत्त्व देता येत नाही, असे राजवाड्यांनीं प्रतिपादन केले आहे ( ऐ. प्र पृ. ३ ) इतिहाससाधन म्हणून असणारे बखरीचे मूल्य सांगणारे राजवाड्यांचे वाक्य-- " एक अस्सल चिटोरे सर्व बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे--' वापरून इतके गुळगुळीत झाले आहे की त्यांतसुद्धां अतिशयोक्ती आहे हे आपल्याला खटकत नाहीं. राजवाड्यांनी अस्सल कागदपत्रांच्या तुलनेने बखरींना कमी लेख लें। आहे, हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. तसेच बखरकारांनीं जाणूनबुजून सत्यापलाप केलेला नाहीं, समकालीन बखरींत स्थलकालविपर्यासाचा दोष कमी आहे, हेंही त्यांनी मान्य केले आहे. वास्तविक आजची इसिहासशास्त्राची पद्धती-ज्यांत अस्सल साधन संग्रह त्याची निवड आणि त्यांतून निःपक्षपाती भूमिकेने काढलेले निष्कर्ष, यांनाच केवळ स्थान आहे-ती पद्धती बखरकाराकडून अपेक्षिणे कितपत न्यायाचे होईल ? त्यांची भूमिका असा शास्त्रशुद्ध इतिहास लिहिण्याची नाहींच. स्थल, काल, व्यक्ती यांचा काटेकोर तपशील देणे ही त्यांची वत्तांतकथनांतील किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्र लेखनामागील भूमिका नाहीं. बखरकाराने वृत्तांत वा चरित्र यांचा स्थल आराखडा वा चौकट ही मुळ ऐतिहासिक आधार असलेली अशी निवडली आहे. या दृष्टीने पाहतां बखरीचा विषय ऐतिहासिक आहे असे म्हणावे लागते, पण या चौकटींत रंगभरणी मात्र बखरकाराने स्वतःच्या विशिष्ट भावनेच्या, भूमिकेच्या कुंचल्याने केली आहे. हे विसरता येत नाही. बखरकाराची या वतान्तांकडे,घटनांकडे वा चरित्रा - कडे पाहण्याची ही भूमिका पुष्कळदां तत्कालीन समाजाची प्रातिनिधिक असते आणि यामुळे बखरीतील वर्णनांत, विकारविचारांच्या आविष्कारांत त्या समाजाच्या आशा-अपेक्षा, भाव-भावना याचे प्रतिबिंब पडलेले आढळते. ही प्रक्रिया जेथे घडते, तेथे इतिहास निराळ्या अर्थाने साकार होतो. बखरीची पाहणी त्यांतील ऐतिहासिक तपशील अस्सल किती या भूमिकेने
पान:पाणिपतची बखर.pdf/14
Appearance