(५) रजकता आणून, डौलदार भाषाशैलीचा आश्रय करून, बखरकार साहित्यगुण प्रकट करतात. इतिहास, चरित्र, ललितकथा यांचे एक आगळेच मिश्रण यामुळे बखरीत तयार होते. या मिश्रणांतून भावनारहित, पक्षरहित अशा इतिहासापासून वेगळी असलेली, परंतु ऐतिहासिक ललित कृतीपासूनही जरा लांबच असलेली अशी बखर सिद्ध होते. विषय इतिहासाधिष्ठित परंतु त्याची मांडणी मात्र ललित वाङमयाच्या गुणविशेषांना पोषक असे बखरीचे स्वरूप वर्णन करता येईल. बखरीचा अभ्यास करतांना बखरींचे हे संमिश्र स्वरूप नेहमी डोळ्यापुढे असले तरच तिला योग्य तो न्याय मिळेल. अन्यथा कधीं इतिहाससाधन म्हणून तर कधीं ललितकृती म्हणून तिच्याकडून भलभलत्या अपेक्षा केल्या जाण्याची शक्यताच अधिक. आपल्याकडे प्रारंभी राष्ट्राभिमानाच्या प्रेरणेतून बखरींचे संशोधन सुरू झाले आणि त्यावेळी अर्थातच बखरींचा अभ्यास राजवाडे, रा. ब. का. ना. साने यांनी इतिहाससाधन म्हणून केला. ही दष्टी एकांगी होती हैं। आज ( विशेषतः वखरीच्या वाङमयीन गुणविशेषावर भर देतांना ) आपल्याला खटकते, परंतु आज आपण बखरीकडे स्वतंत्र वाङमयप्रकार या विशुद्ध वाङमयीन दष्टीने कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी बखरींची निमिती या पद्धतीने झालेली नाही. तिच्यामागें विशुद्ध वाङमयीन प्रेरणा नाही, हे उघड आहे. तेव्हां बखर म्हणजे इतिहाससाधन ही कल्पना चुकीची ठरवितांना बखर आणि इतिहास यांचा जो अतूट संबंध आहे तो तोडणे असमंजसपणाचे होईल. तसेच बखरींत लालित्य असले तरी ती स्वतंत्र निर्मिती किंवा कलाकृती नसते ही तिची मर्यादाही तिचे वाङमयीन आकलन करतांना ध्यानांत ठेवणे अत्यावश्यक आहे. बखरीला असणारे ऐतिहासिकता आणि कलात्मकता यांचे दोन पदर जवळून न्याहाळले म्हणजे तिचे इतिहास आणि ऐतिहासिक कलाकृती यांच्यापासून असणारे वेगळे पण नेमके मनावर ठसेल. बखरीची ऐतिहासिकता बखर म्हणजे इतिहास नव्हे, हे आतां नव्याने सांगण्याची गरज उरलेली
पान:पाणिपतची बखर.pdf/13
Appearance