पान:पाणिपतची बखर.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) करणें या प्रेरणांनी उद्युक्त होऊन हे लेखव झाले. पुढे ज्यांनी धर्म स्थापना केली, त्या अवतारांचे गायन करण्यांत बखर लेखक रमू लागले' असे प्रतिपादन केले आहे. धर्मरक्षण प्रेरणा ही बखरीची मूलप्रेरणा मानणें खरोखर एकांगी आहे. स्वतः डॉ. कुलकर्णीनी बखरीला उतरती कळा का लागली याची मीमांसा करतांना ‘ स्वातंत्र्य, स्वधर्म याविषयों भावना ॐ क्षीण झाल्या. एक राष्ट्रीयत्वाला तडे गेले ' याचा निर्देश केला आहेच. म्हणजेच बखर निमतींत स्वदेशप्रीती व स्वातंत्र्यप्रीती या प्रेरणांचाही. मोठा वाटा आहे, हे ओघाने आलेच बखरीतील घटनांबद्दल व व्यक्तींबद्दल बखरकारांना विशेष आस्था, जिव्हाळा वाटतो, तो या प्रेरणांमुळेच. साकल्याने पाहता बखरीमागील प्रेरणा संमिश्र आ आहेत. पुराणासारखी धर्मजागृतीची प्रेरणा काहींच्या बुडाशी आहे. अखबारनवीसांप्रमाणे ‘कैफियत' मांडण्याचा अट्टाहास कांहीं बखरीत आहे तर कांहीं ठिकाणीं बखर ‘सजविण्याचा' कलाकुसर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही आहे. म्हणजेच निर्भेळ, विशुद्ध अशी कोणतीं एक प्रभावी प्रेरणा या सबंध बखरवाङमयाला प्राणभूत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. धर्मजागृती, देशाभिमानाने परिप्लुत वृत्तांतकथन, ऐतिहासिक व्यक्तींचा गौरव किंवा कलापूर्ण चित्रण अशा विविध प्रेरणांचा कमीअधिक प्रभाव पडून, लेखकाच्या मगदुराप्रमाणे व मनोधारणेप्रमाणे बखरीला रंगरूप प्राप्त होते असेच अखेरीस म्हणावे लागेल. बखर - संमिश्र वाङमय प्रकार बखरीमागील या संमिश्र प्रेरणा लक्षात घेतल्या म्हणजे बखर हा समिश्र वाङमय प्रकार आहे, हे सहज ध्यानात येते. ऐतिहासिक घटना निवेदन करणे, वृत्तांत कथन करणे म्हणजे इतिहास येथे आहे. ऐतिहासिक व्यवतीचे कर्तत्व, पराक्रम यांचे गुणगान त्यांचे चरित्र रंगवून येथे केलेले पाहावयास मिळते. चरित्राप्रमाणे कथात्मकतेचा भागही बखरीत आढळतो. ऐतिहासिक घटनांचे किंवा चरित्रांतील प्रसंगाचे वर्णन यांच्यात भावना आणि कल्पना यांची खुलावट आणून, ललितकथेप्रमाणे निवेदनांत चटकदारपणा