पान:पाणिपतची बखर.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा ८३ संस्कार केल्याचे उल्लेख काशीराजाच्या दोन पत्रांत ( पे, द. २, क्र. १४८, राजवाड़े ६, क्र. ४०८) व अनूपगीर गोसाव्याच्या पत्रांत (राजवाड़े ६, क्र. ४०७) आहेत. पुरुषान देखणा विश्वासरावसाहेब - शिवप्रसादने तारीखे फैजवक्ष मध्ये म्हंटले आहे, ‘विश्वासराव हा तरुण, देखणा आणि अनुपम असा सुंदर होता. ' ( पा. संग्राम ७९ ) मस्तानी - बुंदेलखंडाच्या स्वारीत छत्रसालाकडून बाजीरावाला ही प्राप्त झाली. बाजीराव मस्तानी यांचे प्रेमप्रकरण इतिहासांत प्रसिद्ध आहे आणि अनेक ललित कृतींना या प्रेमप्रकरणाने जन्म दिला आहे. चिमाजी अप्पाला हे प्रकरण पसंत नव्हते. त्याने मस्तानीला के देत टाकले होते पण ती बाजीरावाकडे पळून गेली. अत्यत सुंदर, देखणी असे मस्तानीचे वर्णन ठिकठिकाणीं येते. १७४२ मध्ये तिचा मृत्यू झाला. बाजीरावाच्या मृत्यूनंतर फार दिवस ती जगली नाहीं. पानिपतच्या लढाईवर गेलेला समशेरबहादुर हा तिचा पुत्र होय. पृ. ४७ शके १६८४ .. मंदवासर - राजवाड्यांनी या तिथीबद्दल शंका प्रगट केली आहे. ‘फाल्गुन शुद्धे ५ मीला मंदवार नसून शुक्रवारच आहे' असे ते म्हणतात ( ऐ. प्र. पृ. १०८) पृ. ४९ खांसा इत्रामखान ठार पड़ला - फारशी साधनांतून इब्राहीमखान जखमी झाला. होता. अब्दालीने त्याचा वध केला. अशी माहिती येते. मराठ्यांच्या बाजूने इब्राहीमखान मुसलमानांविरुद्ध लढला म्हणून त्याला धर्मभ्रष्ट असे फारशी ग्रंथांत म्हटलेले आढळते ‘ या धर्म भ्रष्टाला वध हीच शिक्षा योग्य होय' असे तारीखे हुसेनशाही मध्ये अब्दालीने म्हटल्याचें आलें आहे. (पा. संग्राम', पृ. १४० ) याखेरीज पहा तारीखे अहमद (पा. संग्राम, पृ. १६३ ) तारीखे सुलतानी (पा. संग्राम, पृ. १७४ ) काशीराजाच्या बखरीतील वर्णन पुढीलप्रमाणे आहे. ‘इब्राहीमखान गार्दी ' जखमी होऊन