पान:पाणिपतची बखर.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ पाणिपतची बखर खानाने फसवून, दुष्टपणा करून जनकोजीला बख़ुदरने आश्रय दिला असल्याचे शहावलीखानातर्फे अबदालीला कळविले. बख़ुर्दारने याचा इन्कार केला व जनकोजीचा वध करून त्याला पूरुन टाकण्याची आज्ञा आपल्या माणसांना दिली. (पा. संग्राम पृ. १०१-१० ३ ) बापुजी बल्लाळ फडके - हरिपंत बल्लाळ फडके यांचा हा भाऊ, हा पानिपतच्या युद्धात मरण पावला. इ. १७६२ मध्ये हरिपंतास माधवरावाने कारकून नेमले. पृ. ४५-४६ विश्वासरावसाहेब यांचा हत्ती .. श्रम पावले - अनुपगीर गोसावी यांच्या पत्रांत विश्वासरावाचे प्रेत दुराणीनें नेलें होतें तें सुजाउद्दौलाने आपणाजवळ आणविले आणि अनुपगीराला ' आज्ञा केली की येथासांग याचे सार्थक करणे' अशी माहिती आली आहे. (राज. खंड ६, क्र. ४०७) काशीराजाच्या बखरीत वर्णन केले आहे, 'शहावलीखान आणि इतर अफगाण आणि हिंदुस्थानी सरदार यांनी विश्वासरावाचे प्रेत पाहिले आणि ते म्हणू लागले की, ' अशा वर्णाचा आणि सुंदर बांध्याचा मनुष्य आमच्या आजपर्यंत पाहण्यांत आला नाहीं' ( पा. संग्राम पृ. १०१ ) पृ. ४६ आमचा हिंदूचा मुर्दा .. प्रेत त्यांचे हवाली केलें - येथे गोसाव्यांनी अब्दालीकडे अर्ज केला असे बखरकार म्हणतो. काशीराजाच्या बखरीत निराळी माहिती दिली आहे. दुराणी शिपायांनी आग्रह धरला की, ‘ हा दख्खनचा बादशहा होता. त्याचे प्रेत वाळवून देशी नेलें पाहिजे. सुजाउद्दौल्याला ही बातमी कळताच त्याने अब्दालीकडे जाऊन विनंती केली, * वैर हे जिवंतपणीं असते. विजयानंतर शत्रूच्या मृत सरदारांचे दहन अगर दफन त्यांच्या पद्धतीप्रमाणे करवावे असे करण्यांतच लौकिक आहे. विश्वासरावाला आमच्या ताब्यांद देण्यात यावे. हिंदुधर्माप्रमाणे त्याचे दहन करवू.’ (पा. संग्राम, पृ. १०१ ) यदुनाथ सरकारांनी ह्यावर अधारित निर्देश केला आहे. (स. फॉल. २, पृ. ३४९ )विश्वासरावाच्या शवावर अग्नि