Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ पाणिपतची बखर शुजाउद्दौल्याच्या लष्करांत आला होता. ही बातमी अहमदशहाला कळली. दुराणी शिपाई ओरडू लागले, ‘इब्राहीमखान आमचा शत्रू आहे. त्याला आमच्या हवाली करा' दुराणी शिपाई व सुजाउद्दौला यांत कटकट होणार हे पाहून शहावलीखान मध्ये पडला. त्याने दगा करणार नाही म्हणून शपथ घेऊन इब्राहीमखानाला ताब्यात घेतले. त्याच्या जखमेवर विष बांधण्यांत आले आणि त्याला वाईट अन्न देण्यात आले. अहमदशहा दिल्लीत दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी इब्राहीमखान वारला. ( पा. संग्राम, पृ. १०३ )

  • **

१५८०