पान:पाणिपतची बखर.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा ८१ नानासाहेब शोकार्णवी पड़ोन भ्रांत जाहाले - नाना फडणीसाच्या आत्मचरित्रांत याचे वर्णन आले आहे. याखेरीज भा. ब. पृ. १४५१. ४५ सर्वांची भाषणे ... माघारा ढाला फिरविल्या - याबाबत गोपिकाबाईने पेशव्यांची प्रकृती खालावलेली पाहून परत येण्याचा आग्रह धरला असे रियासतकार सरदेसाई म्हणतात, ( म. रि. पे. बा. पृ. ४३१) भाऊसाहेबांच्या बखरींत ‘ गोपिकाबाई यांणीं बहुत बोध विवेकें करून माघारें फिरवि' अशी माहिती येते. येथील कलावंतिणींची विनंती आणि त्याच्या अनुषंगाने कारभारी व सरदार यांची विनंती हे बखरकारांचे कल्पित वर्णन असावे. इंहिदे ... नानासाहेबांनीं कैलासवास केला - नानासाहेब पेशवे २३ जून १७६१ रोजी मरण पावले. ( म. रि. पे. बा. पृ. ४५० ) ( स. फॉल. २, पृ. ३६० ) भाऊसाहेबाच्या बखरींत बाजीरावानंतर ६ महिन्यांनी चिमाजीअप्पा मृत्यू पावले याचा उल्लेख केला आहे. रामभरताची साम्यता दाखविली आहे. ( भा. ब. पृ. १४५ )। जनकोजी शिंदे .. ठिकाण लागलेच नाहीं - जनकोजी शिंदे यांचे ठिकाण लागलें नाहीं असा असा निर्देश कांहीं पत्रांतून आहे सटवोजी जाधवचे पत्र (राज ६.क्र.४०६) नाना पुरंदरे यांचे पत्र (पु. द. ३,क्र. २०९) जनकोजी जाटाच्या मुलखांत गेले अशी बातमी जिवाजी नाईकच्या पत्रांत येते ( इ. सं. ऐ. टि. भाग १, पृ. २०-२१ ) अबदालीने माधवसिंहाला लिहिलेल्या पत्रांत जनकोजीचे काय झाले ते कळले नाहीं( पा. संग्राम. पृ.४२ ) असा उल्लेख आहे तर अली महंमदखान याच्या ' मीराते अहमदी' मध्ये म्हटले आहे. जनकोजी हे जीवंत आहेत का मेले आहेत याचा छडा लागला नाहीं (पा. संग्राम. पृ. ५४) काशीराजाच्या बखरीत मात्र जनकोजी शिंदेच्या मृत्यूची निराळीच माहिती दिलेली आहे. बख़ुर्दारखान याचा दिवाण मोतीलाल याच्या तंबूत जनकोजी शिंदे जखमी अवस्थेत होता. जनकोजीला वाचविण्यासाठी मोतीलाल व काशीराज यांचे प्रयत्न चालू असतां नजीबपा. ब. ६