८० पाणिपतची बखर उद्दौल्याला भाऊंचे प्रेत सांपडले, खूणा पाहून ओळखले व शेवटीं अंत्यसंस्कार केला अशी माहिती आली आहे. पृ. ४४ ते तहकीक ... पुण्यास नानासाहेबांस लिहून पाठविलें - पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पाडाव आणि भाऊंचा मृत्यू यासंबंधी माहिती पुण्यास पेशव्याला बारनिसाने कळविली हें बखरीतील वर्णन चूक आहनानासाहेब पेशवे नोव्हेंबर २२ लाच उत्तरेस निघाले ( राज. ३, क्र.१९७ ) १४ नोव्हेंबरचे भाऊंचे पत्र त्यांना मिळाले त्यानंतर उत्तरेकडील माहिती कळेना म्हणून नानासाहेब अस्वस्थ झाले. ( राजवाडे ३, क्र. २१०) १० जानेवारी १७६१ चे नानासाहेबांचे जे पत्र उपलब्ध आहे त्यावरून ( पु. द. १, क्र.३९५ ) विशेषतः ' कुमक पावावी हेच ईश्वराजवळ इच्छिता या शब्दांतून त्यांची चिंता व्यक्त होते. पानिपत युद्ध समयीं नानासाहेब पेशव्यांचा मुक्काम भेलशाजवळ होता. १९ जानेवारीला पानिपतहून निघालेला सावकारी जासूद त्यांना २४ जानेवारीला भेटला. त्याजवळील सांकेतिक मजकुराच्या कागदाँत लिहिले होते. ‘ दोन मोती गलत. दसवास अश्राफत रुपयोंकी गणति नहीं.' (म. रि. मध्य विभाग ३, पृ. २११) पुढ विस्तृत हकीकत नानासाहेबांना ३ फेब्रुवारीला कळली. नानासाहेब उत्तर सिहोर, सिरोंज, पछार मार्गे गेले. पण त्यांची प्रकृती बिघडली. भाऊचा शोध लागेल ही त्यांची आशा व्यर्थ ठरली आणि २२ मार्च रोजी ते परत पुण्यास आले. ( स. फॉल २ पृ. ३५९, ६० ) |- केवळ भाऊसाहेबांचे वेड लागलें - पुरंदरे दप्तरांतील नानासाहेबांच्या कांहीं पत्रांतून त्यांना भाऊंना आपण दुरावलों म्हणून किती तीव्र दुःख झालें याचे वर्णन अगदीं हृदयस्पर्शी असे आले आहे. पु. द. खंड १, क्र, ४०० - ‘येक भाऊवांचून दुनिया दौलत व्यर्थ आहे. त्याचे हातचे पत्र पाहीन तेव्हा माझे बायकोस मला जीव येइल. आतां तो वेडेपणें आहो. लेक अल्पायुषी होता. सूर्यमंडल भेदून गेला. ते दुःखे परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकिले. परंतु चिरंजीव भाऊवांचून दुनिया व्यर्थ आहे.'
- -