टीपा ७९ वरील फारशी ग्रंथातून भाऊसाहेब मारले गेले अशी निश्चित माहिती दिली जाते. उलट मराठी कागदपत्रात यावावत अनिश्चितता आढळते. कोणः ‘ ठिकाण लागत नाही म्हणतात, पहा. सटवोजी जाधव ( राजवाडे ६, क्र. ४०६ ) नाना फडणीस ( पु. द. १, क्र. ४१७ ) नानांच्या आत्मचरित्रातही असेच वर्णन आहे. तर नाना पुरंदरे (पु. द. ३,*. २०९) भाऊसाहेबांचा थांश जयनगरास लागला आहे असे लिहितात; जिवाजी नाईक ( इस. ऐ. टि. १, २१) 'जाट याच्या मुलुखात गेलेत म्हणतात- भाऊंच्याबाबत अशा कांहीं अफवा उठत होत्या असे दिसते. काशीराजाच्या बखरीत व त्याच्या पत्रात मात्र रणांगणांतून शव आणले व चंदनादिक संस्कार केले असे वर्णन येते. काशीराजाच्या बखरीतील वर्णन विस्तृत आहे. ( पा. संग्राम. पृ. १०४-१०६) सुजाउद्दौल्याने पाणी वाहणारे भिस्ती बरोबर घेऊन पानिपतच्या रणांगणावर शोध केला. तेव्हां एक प्रेत काढतांना त्यावरून मल्यवान मोती खाली पडले. शरीरावर पैशाएवढा काळा तीळ पायावर मत्स्याची खूण व पाठीवर मुजफ्फरखानाने केलेली कट्यारीची जखम अशा खुणा दिसल्य। त्यावरून ते प्रेत भाऊंचेच अशी खात्री झाली. एका दुराणी शिपायाने भाऊंचे शिर लपवले होते तेही न तर मिळाले. शुजाउद्दौल्याने भाऊंचे प्रेत व संताजी वाघाचे प्रेत दोन्ही हत्तीवर घालून आणली आणि काशिराजाकडे संस्कारासाठी दिली. काशीराजाच्या दोन पत्रांत भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या शवावर आग्निसंस्कार केल्याचा उल्लेख आला आहे. (१) २४ फेब्रुवारीचे १७६१ चे नानासाहेबांना लिहिलेले पुत्र पे. द. २, क्र. १४८) (२) ३ मार्च १७६१चे त्रिंबकराव नानांस लिहिलेले पत्र (राजवाई ६ क्र. ४०८) यात तो म्हणतो, ‘ आणिक सेवा न घडली. ईश्वरें हाच वाटा आम्हांस नेमिला होता! भगवन् इच्छेस उपाय काय । अनपगीर गोसवी याचेही. एक पत्र यासंबधींचे उपलब्ध आहे. ( राजवाडे ६ क्र. ४०७) त्यात काशीराजाप्रमाणेच रणभूमींत, सजा
पान:पाणिपतची बखर.pdf/124
Appearance