= टीपा ७७ उद्देशून केलेले तडफदार भाषण राजवाडे खंड ३, पृ. १८६ वर दिले आहे. होळकरांच्या थैलींतील हे भाषण आहे. तेथे मलकाजमानी तयार होऊन अवघ्यांचे मार्गे होती. पठाण फौजेची अधैर्यता पाहून चितागत जाली ... असे वर्णन आले आहे. ( राजवाडे खं. ३, पृ. १८८) । पृ. ४३ ते समयीं. श्रीहरी विनुख जाहला - भाऊंनी हुजुरातीच्या सैन्यासह निकराची लढाई दिली. पण अब्दालीने नव्या दमाचे सैनिक पुढे आणल्यावर त्यांया मायापुढे मराठ्यांच्या थकलेल्या सैन्याचा टिकाव लागला नाहीं व अखेरीस मराठ्यांचा पाडाव झाला अशी मीमांसा रियासतकार सरदेसाई व शेजवलकर यांनी केली आहे. ( म. रि. पे. बा. पृ. ४०३, पा. १७६१, पृ. १७६ ) खंदक भरल्यावर आले - युद्धांत पाडाव झाल्यावर मराठ्यांचा पळ सुरू झाला. अत्यंत हलाखीच्या अवस्थेत लुटीला तोंड देत लोक परत आले. या दुर्दशेचे वर्णन पानिपत प्रसंगाचे हकीगत देणारीं पत्रे, इतिहास ग्रंथ, बखरी सर्व ठिकाणी पाहावयास मिळते. कांहीं महत्त्वाचे संदर्भ खालीलप्रमाणे सटवोजी जाधवाचे सुभानबास पत्र. (राजवाडे खंड ६, कं. ४०९) ‘वरकड लोक पायउतारा, अंगावरीं पांघरुण नाहीं ऐसें, विपत्तीने आले. माणसाचे हाल मोठे जाले, हत्ती, घोडे, पालख्या, डेरे, कुलसरंजाम अवघे लस्कराचा गेला.' खजानाये आमिरा ( पा. संग्राम पृ. ५९ )। रणातून जे पळाले त्यांना आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांनी सर्वस्वी नागविले आणि कित्येकांना ठार मारले. भाऊसाहेबांची कैफियत, भाऊसाहेबांची बखर, (पृ.१४२ ) काशिराजाची बखर यांत कत्तल आणि लूट यांचे भेदक वर्णन आले आहे. । या खेरीज पहा नजीबखान चरित्र ( पा. संग्राम पृ. ६९ ) तारीखे फैजबक्ष ( पा. संग्राम पृ. ७९) ( ।।
पान:पाणिपतची बखर.pdf/122
Appearance