Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ पाणिपतची बखर •7-भाऊसाहेबांनी उत्तर केलें ... वडिलांचे भेटीस आपण जावें हें अयोग्यरणांत विश्वासराव पडल्यावर भाऊसाहेब दुःखाने बेहोष झाले. फार मोठी हानी आपल्या हातून झाली अशा समजुतीने त्यांनी त्वेषाने शत्रूवर चाल केली. होळकरांच्या थैलींत असेच वर्णन आले आहे, ‘भाऊसाहेब म्हणू लागले की, नानासाहेबांनीं विश्वासरावाला माझ्या हवाली केले होते. ना त्यांना काय तोंड दाखवू आणि त्यांना काय उत्तर देऊ. आतां हें जीवन आम्हाला संकट वाटते.’ (पा. संग्राम १. ४० पहा भा. व. पृ. १३३. )। मीरकवीच्या फारसी भाषेतील आत्मचरित्रांत पानिपतच्या हकीकतीत असेंच भाऊंच्या स्वाभिमानी वर्तनाचे वर्णन केले आहे.

  • भाऊ मोठा स्वाभिमानी होता. तो शौर्याची शर्थ करीत होता. जेव्हां त्याने विश्वासरावाचा प्रकार आपल्या डोळ्याने पाहिला तेव्हा तो म्हणाला की, ‘दक्षिनेत जाण्यास आता मला तोंड राहिले नाही आणि मग त्याने जिदावर उदार होऊन अब्दालीच्या फौजेच्या मध्यावर हल्ला केला. (पा. संग्राम. पृ. १८८)

सरदेसाईंच्या मते विश्वासराव पडल्यावर भाऊ बेभान झाला व आवेशाने रणांत घुसला ही सेनापती या दृष्टीने त्याची अक्षम्य चूक होय. भाऊच्या ठिकाणी अनेक बहुमोल गुण होते पण बिकट प्रसंगी शांत चित्त ठेवण्याचा सेनापतीचा मुख्य गुण नव्हता असे त्यांनी म्हटले आहे. ( म. रि. मध्यविभाग ३, पृ. २०० ) मलकाजसानीन .. पदर पसरला की - पानिपत यद्धापूर्वी अब्दालान हिंदुस्थानांत जी स्वारी केली त्यामागे मलकाजमानी या महाराणीचा महंमद शहाच्या पत्नीचा हात होता. शेजवलकर म्हणतात, ‘ या खेपेली अब्दालीला हिंदुस्थानांत बोलाविण्यांत व आतां त्याला छावणी करण्यास लावून मराठ्यांच्या पारिपत्यासाठी थांबवून ठेवण्यांत, नजीबाबरोबर तिचाच पुढाकार होता. ( पानि. १७६१ ) नजीबखानाने सुजाउद्दौला के त्याची आई यांचे मन वळवण्याचे काम मलकाजमानीला सांगितले हा मराठ्यांचे संकट सर्व मुसलमानांविरुद्ध आहे अशा युक्तिवादानें तिने त्यांना अब्दालीच्या बाजूला वळविलेले दिसते. मलकाजमानीने सुजाउद्दौला याला