पान:पाणिपतची बखर.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा ७५ स्वतः अब्दाली आणि त्याचे विजयगीत गाणारा कवी यांनीही मराठ्यांच्या शौर्याची ग्वाही दिलेली आहे; मग बखरकाराला हे वीरांच्या वीरश्रीचे वर्णन करतांना स्फुरण चढल्यास आश्चर्य कोणते ? पृ. ४० विश्वासरावसाहेब अंबारींतून तिरंदाजी ... वैकुंठवासी जाहाले - युद्धाच्या धुमश्चक्रीत मराठ्यांच्या बाजूचे पारडे प्रथम वरचढ होते. पण दुपारीं विश्वासरावाला गोळी लागल्यावर मात्र मराठी सैन्याचे व विशेषतः भाऊसाहेबांचे मनोधैर्य एकदम खचलें. विश्वासरावाला गोळी लागून मृत्यु आल्याचा निर्देश अनेक कागदपत्रांतून व ऐतिहासिक ग्रंथांतून येतो. सटवोजीराव जाधवाची पत्रे ( राजवाडे खंड ६, क्र. ४०६, ४०९ ) नाना पुरंदरे यांचे पत्र ( पु. द. ३, क्र. २०९ ), भाऊसाहेबांची कैफियत, भाऊसाहेबांची बखर, नाना फडणीसाचे आत्मचरित्र यात हीच माहिती आहे. शेजवलकर व यदुनाथ सरकार विश्वासरावाला बाण लागला म्हणतात. ( पा. १७६१, पृ. ९३, स. फॉल, २, पृ. ३४१) रियासतकार सरदेसाई म्हणतात, त्याच्या छातींत झांबरकाची गोळी अवचित शिरून तो तत्काळ गतप्राण झाला. ( म. रि. पे. बा. पृ. ४०५ )। पृ. ४२ तेव्हा मल्हारजी होळकर याँस आज्ञा जाहली कीं, तुम्ही पुण्यास जावेंमल्हारराव होळकरांना भाऊसाहेबांनी पार्वतीबाईंच्या संरक्षणाची कामगिरी सांगितली होती असे होळकरांच्या थैलीत आले आहे. ' मग त्यांनी आम्हाला त्वरेने निरोप पाठविला की आमच्या कुटुंबाला युद्धभूमीतून सत्वर घेऊन जावे. आपणही लढावे आणि रणांगणांत जीव द्यावा हेच आम्हाला इमानीपणाचे वाटले पण भाऊसाहेबांनी दिलेली आज्ञा आठवली. निरूपाय होऊन भाऊ साहेवांचे कुटुंब बरोबर घेऊन आम्ही लष्करांतून निघालों( पा. संग्राम पृ. ४०) मल्हारराव होळकर युद्धांतून पळून आले असा जो आरोप केला जातो त्याची ही दुसरी बाजू पाहण्यासारखी आहे. याखेरीज पहा ( हो. थैली राज. खंड ३, पृ १९१ )।