पान:पाणिपतची बखर.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) फारशीचा संस्कार यांचा बखर सजविण्यासाठीं उचित विनियोग बखरकारांनी केला आहे. फारशीवरून ही इतिहास-चरित्राची लेखनपद्धती (बखर) उचलून तिला पौराणिक साज बखरकारांनी चढविलेला दिसतो. वर्णनांत संस्कृतचा भारदस्तपणा आणून त्याला फारशीमधील शब्द भांडाराची जोड त्यांनी दिली आहे. थोडक्यांत बखर हा लेखनप्रकार फारशींवरून घेतला तरी त्याला वळण मात्र अस्सल मराठी दिले असे म्हणणेच सयुक्तिक ठरेल. बखरीमागील संस्कृत आणि फारशी परंपरेच्या संस्कारांचे धागे उलगडले म्हणजे बखरीचे स्वरूप पूर्णपणे उलगडते असे मात्र होत नाही. याबरोबरच बखर लेख नामागे बखरकारांची विशिष्ट मनोधारणा होती. ज्या कालांत ते वावरत होते व बखरलेखन करीत होते त्या कालांतील प्रेरणांनी ते भारले गेले होते हा महत्त्वाच। धागा लक्षात घ्यावा । लागतो. बखर लेखनाची पार्श्वभूमी व प्रेरणा | मराठीत बखरींना ज्या कालांत बहर आला, त्या कालच्या अनुरोधाने बखर लेखनामागील प्रेरणा सहज अजमावता येतात. शिवकाल आणि पेशवेकाल म्हणजे स्वराज्य प्राप्त झाले व त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. या कालांत बखरींची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. मराठ्यांच्या स्वराज्य-साम्राज्य कालांत देशप्रेम, स्वातंत्र्यप्रेम, स्वामिनिष्ठा, पराक्रम किंवा क्षात्रधर्म यांचा श्रद्धापूर्वक अंगिकार झाला; या प्रेरणा वाढीस लागल्या. बखरकारांच्या मनोभूमिकेत या प्रेरणा रुजलेल्या दिसतात. उत्तरोत्तर । बखरीत या प्रेरणांचेच स्फुरण पाहावयास मिळते. प्रा. ग्रामोपाध्ये यांनी ब वरीमागे वीरयुगाची पार्श्वभूमी होती. शिवकाल व पेशवेकाल या कालांत बखरीत वीरांच्या पराक्रमाचे पोवाडे व रणचंडीचे रोमहर्षक वर्णन यांना उधाण आलें असे म्हटले आहे. ( मराठी बखर गद्य-प्रस्तावना पृ. ३-४) ‘बखरीचे रोपटे स्वराज्याबरोबर वाढलें, साम्राज्याबरोबर त्याचा वृक्ष झाला ' ( मराठी बखर पृ. २४९ ) असे अलंकारिक वर्णन प्रा. हेरवाडकरांनी केले आहे, त्यांत या प्रेरणा गभित आहेतच. डॉ. श्री. रं. कुलकर्णी यांनी ‘ महाराष्ट्रभूमी यवनाक्रांत झाली असतांना घर्मरक्षण, धर्मजागृती