पान:पाणिपतची बखर.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ पाणिपतची बखर गोविंदपंत पुढे तुम्हांस स्वर्गी जागा पहावयास गेले आहेत' या अब्दालीच्या दर्पोक्तीला भाऊसमर्पक उत्तर देतात, ‘ तो जागा सर्वत्रांचा आहे. त्या शिवाय दुसरी गति कोणती आहे? प्रस्तुत तुम्ही थोर, खंदाराचे पातशहा, तुम्ही तेथे जाल तेव्हा तुमचे स्वरूपाप्रमाणे मान झाला पाहिजे म्हणन तुमचे मेजवानीस गोविंदपंत बुंदेले साहित्यास गेले आहेत.' ( भा. ब. १२२ ) मग महर्गतेची वार्ता .. थंड राहिले - नाना फडणीसाच्या पत्रात याला आधार मिळतो, ‘ भाऊ आरबा पसरून खंदक खणून मोगलाई तिन राहिले आहेत. दीन महिने यांची त्याची लढाई होते. मनसबा भारी पडला आहे. पैसा नाहीं, महागाई फार. यामुळे लष्कर गलबलले आहे. (ए: पत्रव्यवहार लेख. ९७ - २८ डिसेंबरचे हैं पत्र आहे. ) मराठी लष्कराची हलाखीची परिस्थिती जाणून अबदालीने त्यान उपासमारीमुळे व बाहेर पडावे लागेल असा डाव टाकला. त्यांना सव बाजूनी हैराण करण्याचा उपक्रम केला. शेजवलकरांनी म्हटले आहे. या प्रकारांनी मराठ्यांचे आरंभी असणारे युद्धदृष्ट्या श्रेष्ठत्व आपोआप कमी होत गेलें व उपासामुळे त्यांस बाहेर पडावे लागले.' ( पा. १७६१ १: १२७)। - राजवाडे म्हणतात, ‘ मराठे अपल्यापेक्षा जोरदार आहेत हे अब्दाला जाणून होता. तेव्हां मराठे उपासमारीनें अर्धमेले होऊन जात तापय त्यांच्याशी युद्ध करावयाचें नाहीं हा जो फेबियन डावपेच तो अबदाला चांगला उपयोजिला. ( ऐ. प्र. पृ. ८८)। पृ. २९ अन्नपाण्यावांचुन घोड्या माणसांचे प्राण जातात - सटवा जाधवराव याने सुभानबास लिहिलेल्या पत्रांत असेच वर्णन आहे. " जानेवारी १७६१ चे हे पत्र आहे. ‘गिलचा आमच्या लष्कराभोवती फिर रस्त बंद केली वैरण जाळली यामुळे लष्करांत काळ पडला. लोकांस अ न मिळे, ऐसा प्रसंग जाला. घोडीं तो बहुत लोकांचीं मेलींच होती. राहि। तीहि पोटामुळे तुटलीं होती. ( राजवाडे खंड ६ क्र. ४०६)