टीपा ७१ आमची गाठ पाणीपताजवळ पडली आहे. तोफखान्याचा आरावा रचून लढाई करावयास तयारी केली आहे. त्याच्याने इकडेतिकडे जावत नाहीं व कांहीं करवत नाहीं' ( राजवाडे खंड १ क्र. २६४. ) कृष्ण जोशीचे ५ नोव्हेंबरचे पत्रही असेच आहे - ‘आमची फौज बहुत शेर आहे. अब्दालीनें स्वदेशास जावे तरी मार्ग नाहीं; युद्ध करावे हरी परिणाम नाहीं, उगेच बसावें तरी भक्षावयास नाहीं.' (राजवाडे खंड १ ३. २६५ )। पृ. २८ परंतु दाणावैरणींकरता पेशवेबहादुर मोठ्या फिकिरांत पडले - अब्दालीने आपली छावणी बदलली आणि उलट मराठ्यांचीच रसद तोडली. मराठी लष्करांत दुष्काळ पडला. (पा. १७६१ पृ. ११७) गोविंदपंत बुंदेले ... खजिना व दाणा भरून निघाले - भाऊने गोविंदपंत बुंदेल्यांना वसुली करून पैसे पाठवावे आणि अब्दालीची रसद तोडावी असे दोन हुकुम केले होते. गोविंदपंताने डिसेंबरच्या प्रारंभीं चार लक्ष वीस हजार रु. गोळा करून नारोशंकराकडे दिल्लीत दिले. त्यानंतर अब्दालीची रसद तोडण्याचा तडाखा त्याने सुरु केला. अब्दालीला ही बातमी कळतांच त्याने अताईखान व करीमदादखान या सरदारांना गोविंदपंतावर पाठवलें जलालावादेजवळ त्यांनी गोविंदपंतांला गाँठले. मराठ्यांची निशाणे दाखवून त्यांची फसवणूक केली व स्नानसंध्या करून जेवणाच्या तयारीत असलेल्या गोविंदपंतांवर अचानक हल्ला केला. त्याचे शिर कापून नेले. येथे बखरीत दिलेली शास्तेखां व जुलपुकरखा ही नांवें चुकीची आहेत. ( पा. १७६१ पृ. १२०-१२१, स० फॉल २ पृ. ३११, म. रि. पे. बा. पृ. ३९३ ) गोविंदपंतांच्या मृत्यूची तारीख शेजवलकर व सरदेसाई २० डिसेंबर सरकार १७ डिसें. मानतात, राजवाडे २२ डिसेंबर (ऐ. प्र. पृ. ८४) पंत सशारनिव्हेचे शीर कापून ... भाऊसाहेबांकडे नजर पाठविले,- या प्रसंगाचे वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीत अधिक विस्ताराने आले आहे, तेथे भाऊंनी अब्दालीला दिलेलें तडफदार प्रत्युत्तरही आहे. ' तुमचे
पान:पाणिपतची बखर.pdf/116
Appearance