पान:पाणिपतची बखर.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा = ७३ उगीच हेका केला - पानिपत प्रसंगावरील लिखाणांत पुष्कळ ठिकाणी ही समजत, कल्पना आलेली आहे. मल्हारराव होळकराचा गनिमी काव्याने अब्दालीशी युद्ध करण्याचा सल्ला न मानतां भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाचा खंदक खणून राहण्याचा सल्ला मानला व आपलाच हेका चालविला यामुळे अखेरीस मराठ्यांची उपासमार होऊन सर्वस्वनाश ओढवला. अशा प्रकारची मीमांसा कांहीं ठिकाणी केलेली आढळते. भाऊसाबांची कैफियत, भाऊसाहेबांची बखर यात तसेच कांहीं फारसी ग्रंथांतूनहि हा विचार मांडलेला आहे. शिवप्रसाद तारीख फैजबक्ष ( पा. संग्राम. पृ. ७७ ) काशि राजाची बखर ( पा. संग्राम. पृ. ८३ ) भाऊसाहेबांचा गर्व, घमेंड यावर अपयशाचे खापर पुष्कळ ठिकाणीं फोडलेले आढळते. भाऊसाहेब स्वाभिमानी होते. त्यांनी आपली मूळ भूमिका कायम ठेवून तहाचा प्रयत्न केला आणि शेवटी • आम्ही युद्धाचे सोबती' हा निर्णय घेतला. अशी त्यांची बाजू शं. ना. जोशी यांनी मांडली आहे. (पा. रणसं. पृ. २२२-२२३ ) पाश्चात्य पद्धतीचे युद्धतंत्र भाऊंनी अवलंबिलें होते कारण उदगीरच्या लढाईत त्यांना तोफखान्याचा प्रभाव कळला होता. परंतु सैनिकांना हें तंत्र अवलंबितां आलें नाहीं, कांहींना कळले नाही, कांहींना कळून पचले नाहीं. ( शेजवलकर पा. १७६१. पृ. १३४ ) पृ. ३१ उद्यां सर्वांनी खंदकणार होऊन मारतां मारतां कटून मरावे - उपासमारीने मेटाकुटीला आलेल्या सरदारांनीं विचारविनिमय केला आणि भाऊंच्या आज्ञेप्रमाणे शत्रूवर तुटून पडण्याचा मार्ग अखेरीस मराठी सैन्याने स्वीकारला. फारशी ग्रंथांतून याच प्रकारचे वर्णन आले आहे. मीराते अहमदी - ( पा. संग्राम. पृ. ५२ ) खजानाये आमिरा - मराठ्यांच्या छावणीत रसदेची टंचाई झाली. उपासामुळे लोक रोज मरू लागले. शेवटीं मराठ्यांनी ठरविलें कों छावणीत कुजून आणि उपासमारीने मरण्यापेक्षां बाहेर पडून लढाई द्यावी. आमच्या नशिबांत मग तक्त असो किंवा तख्ता ( फाशीची फळी ) ( पा. संग्राम. पृ. ५८) तारीखे फैजबक्ष - उपासमारीमुळे सगळे लोक छावणीतून बाहेर पडून सैरावैरा पळत सुटतात की