पान:पाणिपतची बखर.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० पाणिपतची बखर मध्य बाजू - शहावलीखान ( १९००० शिपाई ) । उजवी बाजू - अहमद बंगश ( १००० पायदळ) हाफीजरहमत व धुंधीखान ( १४००० स्वार ) अमीर बेग व बरखुरदरखान (३००० पायदळ } एकूण ६०००० पृ. २२ या युद्धांत बळवंतराव गणपतराव मेहेंदळे यांजवर वार पडला - ७ डिसेंबर १७६० रोजी झालेल्या लढाईत ही दुर्घटना घटली. मराठ्यांना जय मिळूनही ही मोठीच हानी झाली. ( ऐ. प्र. पृ. ८४, पा. १७६१, पृ. १११-११२, स. फॉल. पृ. ३०४) नाना फडणिसाच्या पत्रांत याबद्दल पुढील उल्लेख आहे. ‘ ही लढाई फार चांगली झाली होती. परंतु बळवंतराव यांचा प्रकार असा झाला यामुळे ते सर झाले.' ( रा. खं. १ क्र. २७२) । पृ. २५ ते २७ क्रमांक १८-२० दुतर्फ झालेला नाश, पडलेल्या सरदारांची यादी हा या बखरीचा विशेष म्हणून रियासतकारांनी निर्देश केला आहे. (म. रि. पे. वा. पृ. ४३७ टीप ) पृ. २७ सलूक्षाचे सदाशिवपंत भाऊंडे सूत्र...नाही - भाऊंना तह कोणत्याही प्रकारे अपमानकारक रीतीने नको होता तर अन्नू राखुनच हवा होता नाहीं तर त्यांची लढाईची तयारी होतीच. याविषयी त्यांचे पत्रांतील शब्द लक्षणीय आहेत. ‘लढाई न पडतां सर्व प्रेकन आबरू राहून होतील ते करू सेवटी नेटाने सर्व येकत्र जम्हून लढाई करू.' ( पु. द. १.३८९ ) प्रारंभी मराठ्यांची बाजू वरचढ होती. त्यांना यशाची बरीच खात्री होती त्यावेळचें हें वर्णन आहे. या वेळच्या कांहीं पत्रांतही हा उत्साह अब्दालीची झालेली नाकेबंदी यांचे वर्णन येते. ४ नोव्हेंबर १७६० ला स्वत: भाऊंनी गोविंदपंत बुंदेल्यांना लिहिलेल्या पत्रांतील वर्णन पहा- अब्दालीचा