टीपा ६९ दक्षिणेतील सरदेशमुखी - मोगलांच्या अंमलांतील प्रदेशावर मराठ्यांना उत्पन्नाच्या दशांश किंवा १२॥ टक्के कर वसुलीचा हक्क मिळाला होता. पृ. १७ ( क्रमांक १३ ) भाऊसाहेबांचे हे निधडे उद्गार त्यांची जिद्द, आत्मविश्वास, ठाम भूमिका यांचे प्रत्यंतर देतात. 'हिंदुपत बादशाही येथील बंदोबस्त करणे तो आम्हीच करू तुम्ही पर पादशाहीचे ...' हा रोखठोक जवाब व ‘लढाई करावी हाच आमचा निश्चय' - हा ठामपणा यांतून भाऊंच्या स्वभावाचे इंगितच वखरकाराने प्रकट केले आहे. पृ १८ याप्रमाणे मजालस करून सरफराई केली : भाऊंनीं सरदारांना अनुकल करण्याचे कसे चातुर्याने, व्यवहारी दृष्टीने साधलें हें वर्णनही लक्षणीय आहे. भाऊ उद्दामपणे वागत असा त्यांच्यावर जो आरोप केला जातो त्याचे विराकरण या मजकुरामुळे होते. पृ. २० नंतर सैन्याचे चार भाग : यदुनाथ सरकारांनी सैन्याची आंकडेवारी पुढीलप्रमाणे दिली आहे. ( स. फॉल २, पृ. २८९) । मराठी सैन्य - डावी बाजू - इब्राहीमखान ( ८००० बंदुकधारी पायदळ) दत्ताजी गायकवाड ( २५०० घोडेस्वार ) विठ्ठल शिवदेव ( १५०० घोडेस्वार ), मध्य बाजू - लहान सरदार (२००० घोडेस्वार) भाऊ व विश्वास राव हुजुरातसह ( १३५०० स्वार ) उजवी बाजू - अंताजी माणकेश्वर (१००० घोडेस्वार ) सटवाजी जाधव ( १५०० घोडेस्वार ) लहान सरदार (२००० घोडेस्वार ) यशवंतराव पवार ( १५०० शिपाई) समशेर बहाद्दर ( १५०० शिपाई) जनकोजी शिंदे ( ७००० स्वार ) मल्हारराव होळकर (३००० स्वार ) एकूण ४५०००, दुराणीचे सैन्य - डावी बाजू शहापसंद (५००० घोडदळ ) नजीबखान ( १५००० पायदळ ) सुजाउद्दौला (३००० स्वार)
पान:पाणिपतची बखर.pdf/114
Appearance