६८ पाणिपतची बखर कैफियतीत. 'पुरातन मराठा धर्म सोडन अविधी धर्माचा स्वीकार केला' अशी टीका केलेली आढळते. भाऊसाहेबांची बखर व नाना फडणीसाच्या आत्मचरित्रांत हीच विचारसरणी व्यक्त झाली आहे. मुलुख अगदीं ... तवईचा वक्त गुजरला - मराठ्यांवर दुष्काळाचे मोठे संकट गुदरलें, १५ नोव्हे. १७६० पासून १४ जानेवारी १७६१ पर्यंत मराठी सैन्याची आस्ते आस्ते उपासमार होत चालली होती. ( ऐ. प्र. पृ ८३ ) पृ. १३ प्रथम गोठ सोडून बाहेर निघाले - मराठे-अब्दाली यात १ नोव्हेंबर १७६० पासून बयाच लढाया झाल्या. त्यातील पहिल्या लढाईचे हे वर्णन असावे. रियासतकारांनी ५ लढायांचे वर्णन केले आहे. त्यापैकी डिसेंबर ७ ची व डिसेंबर २० ची या दोन लढायांचे वर्णन पुढे बखरीत आले आहेच. पहिलीत अळवंतराव मेहेंदळे पडले व दुसरीत गोविंदपंत वंदेल्यांना मारण्यांत आले. पृ. १५ । | दिल्लीपत बादशाहीचा व सुरळीतपणाचा जवा बसवून ... स्वदेशास जावे - मराठ्यांनी समेट करून स्वारीचा खर्च घेऊन परत जावे असे तहाच्या वेळीं अट म्हणून अब्दालीतर्फे वकिलांनी सांगितले. तहाच्या अटींत अब्दाली अटकेपार गेल्यास भाऊंनीं नर्मदेपार जावे अशी अट प्रामुख्यान होती. ( पा. रणसंग्राम, पृ. २२०) बखरीत पुढे आले आहेच, ‘ नर्मदा दक्षण तीरापासून पलीकडील हद्द तुम्ही आपली संरक्षण करून असावे. पृ. १६ ते तख्त फोडून बादशहा पररांगदा करवून - आलमगीर (दुसरा) याचा पुत्र अलीगोहर हा नोव्हेंबर १७५९ मध्ये पळून गेला त्याचा हा निर्देश आहे. वास्तविक भाऊंनीच याला दिलीस आणून राज्याचा वारस म्हणून बलीहद समारंभ केला. ( १० ऑक्टोबर १७६० ) ( पा. रणसं. पृ. २१३ ऐ. प्र. पू. ७७.. :)
पान:पाणिपतची बखर.pdf/113
Appearance