Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दीपा , ६.७ याय। आहे. दत्ताजी शिंदे याचा वध करणाच्या निजाबतखानाच्या ताब्यांत कुंजपुन्याचे ठाणे होते. इब्राहीमखानाच्या तोफखानाच्या मदतीने मराठ्यांनी हे ठाणे हसतगत केलें ( १६ ऑक्टो १७६० ). पृ. ११ इराणो दुराणी ... यमुनातीरास -अब्दालीने बागपताजवळ यमुना पार केली त्याचा हा उल्लेख दिसतो. इब्राहीमखान गाडदी - मूसावुर्सच्या गारद्यांच्या पलटणीत । इब्राहीमखान होता. प्रारंभ निजामाकडे तो नोकरीस होता नंतर १७५६ मध्ये सदाशिवरावाने त्याला नौकरीस ठेवले. उदगीरच्या लढाईत त्याच्या तोफखान्याचा प्रभाव विशेष दिसला. पेशवे दग्तांत याचे उल्लेख आहेत. भाऊसाहेबांच्या वख संत भाऊसाहेबांनी त्यास इनाम दिले होते अशी माहिती येते. पानीपतच्या मोहीमेवर जातांना भाऊसाहेबांनी याच्या तोफखान्याची मदत आपल्याला इराणीशी लढतांना होईल ही अटकळ बांधली होती. प्रत्यक्ष मोहीमेंत खंदक खणून मोर्चे बांधण्याचा त्याचा सल्ला अनुसरला. दिल्ली काबीज करतांना इब्राहीमखानाने तोफांचा असा जबरदस्त मार दिला की तेव्हा किल्ल्याचा एकेक बुरुज धडाधड कोसळू लागला त्यावेळी अब्दालीने उद्गार काढले ‘एवढा इसम आपल्या बाजूस असेल तर साच्या हिंदुस्थानचे राज्य आपण हाकू' ( ना. पे, चरित्र, पृष्ठ १९१ )। मराठे बडे को लढनेवाले ... वयः करना - मराठयांकडून कुंजपु-याला अफगाणांचा झालेला हा पराभव अबदालीला सहन झाला नाही. ( अधार - नूरुद्दीन नजीबखान चरित्र, पा. संग्राम पृ. ६१ ) पृ. १२ लष्करा भोवती खंदक - इब्राहीमखानाच्या सल्लयावरून भाऊसाहेबांनी खंदक खणून सैन्याभोवती गोल बांधले. या पद्धत ने पानिपतास मराठी सैन्य कांहीं काळ संरक्षित राहिले तरी नंतर मात्र अवदालीनेच त्यांची रसद तोडून नाकेबंदी केली व शेवटी मराठयांवर उपासमारीची पाळी आली. खंदक खणून राहण्यावर भाऊसाहेबांच्या