पान:पाणिपतची बखर.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ पाणिपतचीं बखर गाजीउद्दीनाला वजिरी व आपल्याला अंमलदारी द्यावी हें जाटाचे म्हणणे भाऊंनी मान्य केले नाही म्हणून तो गेला. स्वतः भाऊ लिहितात, ‘ पातशाही हातास आली अशी समज जाटाची ते राहिले, यास्तव जाट कष्टी । ( पा. रणसं. पृ. २०४) छत काढल्यासंबंधी दुस-या एका भाऊंच्या पत्रांत खालील मजकूर आहे. ‘तूर्त आम्हास पोटास पाहिजे. बहुतच उपास फौजेस होऊ लागले. त्यास पातशाही किल्ल्यात दिवाणखान्यास रुप्याचे छत होते, त्यास वजिरान थोडकसे काढिलें होतें बाकी आम्ही काढिले; नवा लक्षाचे रुपे निघाः। त्यांपैकीं कांहीं सरदारास दिल्हे बाकी फौजेस वाटले. त्याणी महिनाभर स्थित राहिली' (पे. द. २७, क्र. २५७) चांदीचे छत काढल्यामुळे तख्ताचा अपमान भाऊंनी केला ही समजून अयोग्य होय. भाऊ खर्चाच्या फार मोठ्या पेचांत सांपडल्यामुळेच त्यांनी हा मार्ग अनुसरला. पूर्वी वजीराने छत काढले होते. उरलेले भाऊन काढलें तेंहि सरदारांच्या संमतीने. यांतून ९ लाख रु. मिळाले व महिन्याचा खर्च कसाबसा भागला. वास्तविक जाटाने त्याच्याकडील येणे दिले असत तर ही वेळ आली नसती. पृ. १० एकूण सात कोट रुपये लष्करांत पावले - बखरकाराने ७ कोटी रुपये भाऊसाहेबांना मिळालें असे म्हटले आहे व त्याचा तपशीलही दिला आहे. परंतु या वर्णनाला ऐतिहासिक आधार नाही. है। जाट सुरजमल्ल यांनी ... एक कोट रुपये लष्करांत पावते केले - जाटाने तर यावेळीं मुळीच वसूल दिला नाहीं असेच उलटे कागदोपत्री नमूद आहे. तो कुंजपुरावरच होता .. खजोना लुटून नेला – दुष्काळ आि महागाई यांनीं त्रस्त झाल्यावर भाऊसाहेबांनी दाणागोटा व पैसा मिळवण आणि अब्दालीचे नाक्याचे ठाणे काबीज करणे या उद्देशाने कुंजयुन्या स्वारी केली. या स्वारींत : श्रीमंतांस पांच सात लाख रुपये मिळा दाणादुणा लष्करास मिळाला, ( राजवाडे खंड ६, ऋ. ४०५) असे नम्