टीपा ६५ १७३, १७९, १८७ ) ‘अबदालीची जड हिंदुस्थानचे पातशाहीत रुतो देणे हें अयोग्य’ हें एक सूत्र आणि ‘पातशाहत दिल्लीस कायम करावी' हे दुसरें सूत्र असे या भूमिकेचें थोडक्यांत वर्णन करता येईल. बखरकाराने भाऊसाहेबांच्या उत्तरांत नेमकी हीच सुत्रे ग्रथित केली आहेत. पुढेहि म्हटले आहे, 'आम्ही फरजंद, ... जेणेकरून बादशाही सलामत राहील तेच करावयास आलो आहों.’ (पा. सं. प्रस्तावना, पृ. १७--१८, पा. रणसं. पृ. १७९-१८० ) वि7 पृ. ८ जाट अविश्वासू ... त्यांणी भाऊसाहेबांस दाखवून ... दिल्लीस आणिलें - का. ना. साने व प्रा. हेरवाडकर यांनी हे वर्णन निराधार आहे असे म्हटले आहे. ( प्रा. हेरवाडकर पा. ब. पृ. १० वरील तळटीप ११ ) परंतु जाटाचा अविश्वासूपणा, धूर्तपणा उघड करणारे भाऊसाहेबांचे पत्र उपलब्ध आहे. ( पा. रणसं. पृ. ५९-६४ भाऊसाहेबांनी बाबुराव राम यास लिहिलेले पत्र क्रमांक २७ ) यांत भाऊ स्पष्ट म्हणतात 'पलीकडील कारभारी सुज्याउतदौल्याचे व नजीबखानाचे अबदालीचे त्याणे आणविले. आम्हांस तुमच्या कारभारास्तव आणविले म्हणून सांगतो. त्यासी अतस्त काय बोलतो न कले, याप्रमाणे 'जमीदारीवर' आहे.'जाटाचे धूर्त कावेबाज वर्तन, त्याचा जमीदारी कावा शं. ना. जोशी यांनीं विस्ताराने उघड केला आहे. ते विवेचन पहावे (पा. रणसं. पृ. २०४-२०६ ) शेजवलकरांचे विधान- " सबंध पानिपत मोहिमेत भाऊ सुरजमल बाबत कोठेही साशंक असलेला दिसत नाहीं' (पा. १७६१, पृ. ७७) हे अर्थातच या पत्राधारें चूक ठरते. १. ९ जाटात व सदाशिवपंतात पादशाही तख्तामुळे विकल्प - चांदीचे छत काढल्यामुळे जाट रुसून गेला हा आतापर्यंतचा समजही ( भाऊसाहेबांच्या बखरीमुळे पक्का झालेला ) योग्य नाहीं असे शं. ना. जोशी नी म्हटले आहे. भाऊंच्या सैन्याने दिल्ली ताब्यात घेतल्यावर | ; पो. ब. ५ ।।
पान:पाणिपतची बखर.pdf/110
Appearance