६४ पानिपतची बखर । त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व (Towering Personality ) आणि लष्करी शिस्त ( Military Discipline ) यांचा विशेष उल्लेख केला आहे. पृ. ६ सदाशिवपंत ... दिल्लीस दाखल जहाले ... ३१ जुलै १७६० या दिवशी ही घटना घडली. ( पा. १७६१, पृ. ४४, पा. रणसं. पृ. ४४) पृ. ७ । खर्चास पाहिजे - भाऊसाहेबांच्या पानिपत मोहिमेत त्यांचे पशाविना फार हाल झाले. त्यांच्या खर्चाच्या मानाने त्यांना फारच थोडी रक्कम मिळाली. दररोजचा खर्च ५ लाख रु. या हिशेबाने या स्वारीत पाऊण कोटीपर्यंत खर्च झाला. परंतु बेताचीच रक्कम भाऊंना उपलब्ध झाली गोविंदपंतांकडे तगादा लावूनहि फारसा वसूल मिळाला नाहीं. चांदाच्या छताचे ९ लाख, कुंजपु-याच्या लुटीचे ७ लाख, पडदूरहून निघताना मिळालेले १ लाख, नारोशंकरकडील १ लाख १० हजार, गोविंद पंतांकडा २ लाख, बाबूराव कोनेर याजकडील पाऊण लाख ८० हजार जत काही आकडे उपलब्ध आहेत. ( पे. द. २७, क्र. २५७, स. फॉल २, पृ. २९२ जाटाचा विश्वास नाही - भाऊसाहेबांना जाटाने • जमिदारों कावा कसा दाखविला याची प्रमाणे आतां उपलब्ध झाली आहेत. " पाहतां बखरकाराने भाऊंच्या तोंडी घातलेले हे शब्द अगदी या वाटतात. कावेबाज, धूर्त जाटाने भाऊसाहेबांनी हत-हेने त्या वळविण्याचा प्रयत्न केला तरीहि ओढून धरण्याचाच पंथ चालविला ( पा. रणसं. पृ. २०५ )। बादशाही कायम करावी - भाऊसाहेबांचा उत्तर हिंदुस्थानातील स्वारीचा उद्देश कोणता होता, त्यांची या मोहिमेमागील भूमिका का होती यासंबंधी त्यांनी गोविंदपंत बंदेले, गोपाळराव बर्वे यांना जा लिहिली आहेत त्यांतून स्पष्ट उल्लेख येतात. ते म्हणजे मोगल पातशाहा संरक्षण करणे आणि त्यासाठीच अब्दालीशीं सर्वांनी एकत्र होऊन लढ त्याला हिंदुस्थानांतून घालवून देणे. ( राजवाडे-खंड १--पत्रे क्रमांक १६॥
पान:पाणिपतची बखर.pdf/109
Appearance