(२) शब्द वर्णव्यत्यास होऊन आला असे मानतात, ही व्युत्पत्तीच अधिक ग्राह्य वाटते. " मुसलमानांच्या सहवासाने त्यांच्या तवारिखा पाहून मराठयांनी हि बखरी लिहिण्याचा प्रघात पाडला' ही राजवाड्यांची उपपत्ती (ऐ. प्र. पृ. २ ) या व्युत्पत्तीला पोषकच आहे. राजवाड्यांचे हें अनुमान प्रमाण मानले तर बखर या शब्दाचे मूळ व ही कल्पना परकीय आहे असे म्हणावे लागते. प्रा. हेरवाडकरांनी हेच मत मान्य केलेले आहे. ( मराठी बखर पृ. ९) परंतु अलीकडे डॉ. श्री. रं. कुलकर्णी यांनी आपल्या प्राचीन मराठी गद्य-प्रेरणा आणि परंपरा' या ग्रंथांत बखर या शब्दाची खबर या फार्थी शब्दावरून लावलेली व्यत्पत्ती आणि बखर हा प्रकार परकीय अनुकरणाने मराठीत आला ही कल्पना या दोन्ही अग्राह्य ठरविल्या आहेत. ‘प्राचीन काळी टिकाऊ स्वरूपाचे लेख चामड्यावर लिहिले जात. ते चामडे बकरीचे असण्याची शक्यता आहे, म्हणून बकर वरून बखर' अशी व्युत्पत्ती ते मांडतात. (पृ. १०० ) ही व्युत्पत्ती ओढून ताणून लावलेली दिसते. डॉ. श्री. रं. कुलकर्णी यांचा मुख्य रोख । फारसी अखबारनवीस आणि मराठी बखरकार यांच्या भूमिकेत मूलभूत फरक आहे.' यावर आहे. प्रशस्ती गाणाच्या आश्रितांच्या मालिकेत बखरकारांना बसविणे चुकीचे ठरेल. कारण, अप्रिय सत्याचे कथन, पराजयाच्या घटनांची नोंद बखरकार करतात असे स्पष्टीकरण करून डॉ. कुलकर्णी म्हणतात, ' बखरकारांनी अखबारनवीसाचे अनुकरण केले असेल हें सभवनीय वाटत नाहीं' (पृ. ९७ ) बखर हा प्रकार सर्वस्वी पूर्वपरपरेतून निर्माण झाला हें डॉ. कुलकर्णीचे आग्रहाचे प्रतिपादन पटण्यासारखे नाहीं. बखरकारांनी अखबारनवीसचे तंतोतंत अनुकरण केले नाहीं हैं। खरे पण पुष्कळ वेळा बखरकारांची भूमिका के फियती सादर करण्याची, समर्थनपर, दृष्टी पक्षपाती होती हें नाकारता येणार नाही. भाऊसाहेबांची बखर, सभासदाची बखर, पानिपतची बखर या धन्याच्या आज्ञेवरून लिहिल्या गेल्या आहेत. बखरीमागील हा पोष्य-पोषक भाव संपूर्णपणे दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. तसेच कित्येक बखरकार पारसनवीस म्हणजे फारशी भाषेत तरबेज होते. एकीकडे संस्कृतची परंपरा तर दुसरीकडे
पान:पाणिपतची बखर.pdf/10
Appearance