Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा ६३ ,, सुजातदौले - सफदरजंगाचा मुलगा सुजाउद्दौला. याचे मूळ नांव जलालुद्दीन हैदर. हा अयोध्येचा नबाब होता याच्या जवळ पैसा, फौज व तोफखाना असल्यामुळे पानिपतच्या युद्धापूर्वी मराठे व अब्दाली यः। दोन्ही पक्षांनी त्याला आपल्याकडे ओढण्याचे जबरदस्त प्रयत्न केले. मराठ्यांशी याचा प्रथम स्नेह होता पण नजीबखानाच्या दडपणाम् ॐ च मुसलमान म्हणून अब्दालीस मिळाला. दिल्लीची वजिरी मिळविण्या वा । त्याची महत्त्वाकांक्षा होती त्यासाठी त्याने धर ।ोड केली. ( पा. रण. पृ. १८४-१९२ पहावी ) । । मातबर माणूस वकिलीस - भाऊसाहेबाने सुजाउद्दौलाकडे श्याम जी रंगनाथ यात पाठविले होते ( राजवाडे खंड १, क्र. १८९) भाऊंचे शुजास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून त्यांची भूमिका, राजकारणी दृष्टी क उन येते. (पा. संग्राम, पृ. १४५ वर हे पत्र आहे.) पत्रांत भाऊ म्हणतात, ‘तुम्ही आम्ही एकाच भात्यांतील बाग. तैमूरचे घराण्यांचे मिठाला जागावे. आम्हाकडे यावे. विजयी झालों तर शहा अलम पातशहा व तुम्हास चजिरी देऊ ... पूर्वापार स्नेह चालू न ठेवणे, दुस-याला मिळणे न्यायाला सोडून होईल. भाऊंनी रामाजी अनंत व नारोशंकर यांना सुजाकडे पाठविल्याचा उल्लेख अहे. ( राजवाडे खंड १, क्र. २०४ ) अबदल्ली इराणी ( इ. स. १७२४-१७७२) - अबदालीला नादिरशाहाने आपल्या सैन्यात नोकरी दिली. इ. स. १७३९ मधील नादिरशहाच्या स्वारीबरोबर हा होता. नादिरशहाच्या वधानंतर इ. स. १७४७मध्ये याने कंदाहार काबीज केले. अबदालीने इ. स १७४८ त हिंदुस्थानवर पहिली स्वारी केली. पुन्हा १७५२, १७५५ व १७५९ मध्ये त्याने उतर हिंदुस्थानवर स्वाध्या केल्या. १७५९ मधील बुराडी घाटावरील युद्धांत दत्ताजी शिंदे मारला गेला. जानेवारी १७६१ मध्ये पानिपतावर अबदालीचे मराठ्यांशी निकरा युद्ध झाले. सेनानी या दृष्टीने अबदाली सदाशिवरावाहून वरचढ होता, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. (म, रि. मध्य वि, ३, पृ. १५४ ) यदुनाथ सरकार अबदालीला Lesser Nadic "हणून गौरवितात. ( स. फॉल २, पृ. २९०) गुल्चर सिंह यांनी