पाणिपतची बखर • । १७४ मध्ये रजपुतांकडे पत्रे, वकील, पाठविल्याचा उल्लेख आहे. ‘सर्व मंडळी दोही राजकारणावर' असल्याचा तेथे निर्देश आहे. कुंभेरी प्रकरणीं होळकरांनी रजपुतांना दुखावले व शिंद्यांनीं मारवाडच्या विजे सिंगाला कुटले. यामुळे रजपूत मराठ्यांना सामील झाले नाहींत. रजपूतांमधील आपसांतील भांडणांत मराठे सरदार शिंदे होळकर यांनी भाग घेऊन त्यांना दुखावल व याचा परिणाम म्हणजे पानिपतावर त्यांना एकाकी लढावे लागले. प्रा. शेजवलकर व गुलचरणसिंह यांनी या मुद्यावर विशेष भर दिला आहे. ( पा. १७६१, पृ. ५८, ८६ ). (The Battles of Panipat, P. 76, 77) हस्तनापुरवासी पातशहा - दुसरा आलमगीर इ. स. १७५४ म६३ तख्तावर बसला. गाजीउद्दीन वजीराला याचे अब्दालीशी संगनमत आहे हैं। कळताच त्याने त्याला ठार केले. । मनसूरअली - हे नांव या बखरीत नजीबखान रोहिल्याबद्दल चुकीने आले आहे. मनसूरअली म्हणजे सफदरजंग हा अयोध्येचा कारभार पाहत होता. १७५४ त तो मृत्यू पावला व सुजाउद्दौला नवाब झाला. नजीबखा न राहिला (इ. स. १७२८-१७७० )- पानिपतच्या युद्धाचे मूल कारण म्हणजे नजीबखान होय, कंदाहार येथील गरीब पठाणाचा हा मुलगा हिंदुस्थानांत प्रथम साधा शिपाई म्हणून नोकरीस लागला. लौकरच कर्तवगारीमुळे तो फौजेचा प्रमुख बनला. सफदरजंगाविरुद्ध इमाद उल्मुकाला याने मदत केली. बादशहाने याला मनसबदारी दिली. दिल्लीच्या राजकारणांतील नजीबखानाच्या महत्त्वाकांक्षेमुळेच मराठे व अब्दाली यांच्यांत तह होणे अशक्य झाले व - पानिपतचे यद्ध ओढवले. हा हिंदू मुसलमानांचा झगडा आहे, हे धर्म यद्ध आहे असे भासवून मराठ्यांविरुद्ध सर्व मुसलमानांना त्याने एकत्र केले. नजीबखानाच्या घरभेदी प्रवतीची नेमकी जाणीव भाऊसाहेबांना हे ती याचे प्रत्यतर त्यांच्या पत्रांतील मामिक वाक्यांवरून येते. नजीवखान तो अब्दालीच आहे ... नजीबखान तर मूळच आहे. ( राजवाडे खंड १, ऋ, १६ } १३.०६:; ; ) १९:१०,
पान:पाणिपतची बखर.pdf/107
Appearance