• • ६१ जाट सुरजमल (इ. स. १७४३-१७६३ ) - भरतपूरचा राजा. बादशहा सफदरजंग यांच्या भांडणांत याने सफदरजंगाला साह्य केले. सफदरजंगाने त्याला आग्रयाची सुभेदारी दिली. शिंदे, होळकर यांच्याबरोबर जाटानेंहि अब्दालीकडून मार खाल्ला. भाऊसाहेबांना त्याने आपल्या मलखांत उपद्रव देऊ नये असे कळविले होते, ( पे. द. २१ क्र. १९० ) भाऊ व जाट यांच्यांत पुढे मतभेद झाला व जाट दिल्लीहून निघून गेला. तरीसुद्धां पानिपताहून पळालेल्या मराठ्यांना याने मदत केली. ( भा. ब., पृ. १४२ ) पृ. ५ यमुनातटाकास सदाशिवपत भाऊ दाखल जाहले - भाऊंच्या स्वारीचे टप्पे इतिहासकार पुढीलप्रमाणे देतात. । रियासतकार सरदेसाई ( म. रि. पे. बा., पृ. ३५४-३५५ ) १८ मार्च १७६० सिंदखेड ६ मे सिरोंज - ४ एप्रिल बहाणपूर २१ मे = नखर। १२ एप्रिल हडिया, ८ जून चंबलपार २४ एप्रिल सिहोर १४ जुलै आग्रा शं. ना. जोशी ( पा. रणसंग्राम पृ. ४३-४४ ) मुक्काम मुक्काम तारीख पडतूर मार्च १३ ग्वालेर मे ३० शिंदखेड मार्च १४ चमेल पलीकडे जून ८ बहाणपूर एप्रिल ४ आग्नयाजवळ जून २५ हंडिया एप्रिल १६ मथुरा जुलै १५ सिहोर एप्रिल २८ दिल्ली शहर जुलै २७ सिरोंज मे ६ । दिल्ली किल्ला ऑगस्ट १ रजपूत यांनी ... स्वस्थ राहिले-मराठे व दुराणी यांच्या या लढाईत रजपूत तटस्थ राहिले. भाऊसाहेबांनीं गोविंदपंत बुंदेले यांना उत्तरेकडील सरदारांना आपल्या बाजूस वळवण्याबद्दल लिहिले होते. राजवाडे खंड १, पत्र क्र. तारीख
पान:पाणिपतची बखर.pdf/106
Appearance