Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० पाणिपतची बखर याने पराक्रम केला. दमाजी गायकवाडाचे बंड मोडले. पानिपतवरील डिसेंबर ७ च्या लढाईत याला गोळी लागून मृत्यू आला. मराठ्यांना यश मिळूनही यामुळे मोठी हानी सोसावी लागली. याची पत्नी लक्ष्मीबाई सती गेली. या घटनेचें करुण वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीत आहे. ( भा. व. पृ. १२४-१२५ )। ( भाऊसाहेबांबरोवर हिंदुस्थानांतील मोहीमेस गेलेल्या सरदारांची यादी बखरकाराने दिली आहे ते सर्वच प्रारंभापासून बरोबर नव्हते. काही नंतर वाटेत मिळाले. ऐतिहासिक प्रस्तावनेमध्ये इतर कांहीं नांवे आला आहेत - महिपत राव चिटणीस, मानाजी पायगुडे, अंताजी माणकेश्वर, माने, निंबाळकर.) १. ४ नबाबांनी कटकट काढिली - दत्ताजी शिंदे पडल्याची बातमा मिळाल्यावर निजामानें त्रास देण्यास सुरुवात केली. चवसरुट लक्षांचा मलख सोडवन - इ. स. १७६० मध्ये निजामा२।। उदगीर येथे मराठ्यांची लढाई झाली. निजामाचा पराभव झाला. मराठ्यांना तहाअन्वये निजामाकडून ६४ लक्षांचा मुलूख मिळाला. हा तह घडवून मुलूख मिळवण्यांत भाऊसाहेब यांचा वाटा मोठा होता. - उज्जनी पावेतों - याला आधार नाहीं. अंताजी माणकेश्वर (मृत्यू १७६१)- याचे आडनांव गंधे. हा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होता. शाहू महाराजांकडून हा पेशव्यांच्या सैन्यात आला बादशहाच्या संरक्षणास पेशव्यांच्या वतीने हा १७५२-५३ मध्ये राह होता. दरबारातील मराठ्यांचे वकील हिंगणे यांच्याशी अंताजीचा कलह होता. गैरकारभार, अव्यवस्था यामळे भाऊसाहेबांचे मत याच्याविषयी बिनसलें होते १७५९ मध्ये याच्या कारभाराची चौकशी झाली व पेशव्याने त्याला निर्दोष सोडले. पानिपतवरून पळून येत असतां हुल्लडींत हा मारला गला. पानिपतविषयक एक बखर यांच्या नांवावर नोंदली गेली आहे: ( म. सा. आवृत्ती ५ वी, पृ. ६०७)