पान:पाणिपतची बखर.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ टीपा जनकोजी गोळी लागून जखमी झाल्यावर युद्धाचा रंग बदलला व सैन्याने पळ काढला. त्याची पत्नी काशीबाई स्वारीवरोबर होती. पतीचे निधन झाल्यावर तिने दाखविलेली हिंमत व पोक्त बुद्धी भाऊसाहेबांच्या बखरकारानें वणिली आहे. यशवंतराव पवार ( मृत्यू १७६१ ) - धारच्या आनंदराव पवारांचा हा पुत्र. बाजीरावाच्या माळवा, बुंदेलखंड या स्वान्यांत हा प्रमुख सरदार होता. चिमाजी अप्पाच्या कोकण, वसई या मोहीमांतही याने पराक्रम केला. भाऊचे व याचे भांडण होऊन याचा सरंजाम इ. स. १७४७ त जप्त झाला. कांहीं काळ याने निजामाशी मैत्री केली. पुढे याचा पेशव्यांशीं समेट झाला. १७६० मधील उदगीर लढाईत याने पराक्रम गाजवला. पानिपतावर याला मृत्यू आला. सोनजी भापकर ( मृत्यू १७६१ ) - हे लोणीचे पाटील. पानिपत युद्धांत याने होळकरांबरोबर एक बाजू संभाळली होती. सुजाउद्दौल्याचा याने पराभव केला. रणांगणावर याला मृत्यू आला. | गोविंदपंत बुंदेले ( मृत्यु १७६० ) - गोविंद बल्लाळ खेर. हा कहाडा जातीचा. भाऊबंदांनी केलेल्या हेटाळणीमुळे सैन्यांत दाखल झाला. बाजीरावाबरोबर हा बुंदेलखंडाच्या स्वारीत होता. बाजीरावाने त्याला बुंदेलखंडाच्या कारभारावर नेमले. उत्तरेकडील राजकारणांत हा प्रमुख होता. भाऊसाहेबांनीं पैसा पुरविण्यासाठी वारंवार पत्रे लिहूनही याने मदत केली नाही तसेच अबदालीची रसद मारली नाही म्हणून राजवाड्यांनी याच्यावर गजब उडविला आहे. राजवाड्यांनी पानिपतच्या मोहीमेचे अपयश गोविंदपंत बुंदेल्यांच्या माथीं मारले आहे. (ऐ. प्र. पू. ८०, ८५ ) राजवाड्यांचे हे मत खोडतांना साध्या कमाविसदाराकडून फार मोठी अपेक्षा भाऊने केली असे प्रा. शेजवलकरांनीं प्रतिपादिले आहे. (पा. १७६१, पृ. ११७ ) तर सदाशिवरावाने त्याजवर शक्तीबाहेरचीं कामं टाकली असे सरदेसाई म्हणतात. ( म. रि. मध्यवि. ३. १. १४२ ) बळवंतराव गणपत ( मेहेंदळे ) ( मृत्यू १७६० ) - नाना फडणिसाचा हा मामा. पेशव्यांचा प्रमुख सरदार. कर्नाटक, म्हैसूर स्वान्यांत