पाणिपतची बखर वाजीरावाच्या मृत्यूनंतर याचे वर्चस्व उत्तर हिंदुस्थानात वाढले. रोहिल्यांचे बंड मोडण्यांत सफदरजंगाला मदत केली म्हणून अंतर्वेदींत मोठा मुलूख मराठ्यांना मिळाला. मल्हाररावालाही त्यांत भाग मिळून त्याची स्वतंत्र कारभाराची हाव वळावली. दत्ताजी अवदालीशी लढत असतां मल्हाररावान चकारपणाचे धोरण स्वीकारले, त्याला मदत न करतां कालविक्षेप कला याबद्दल राजवाडे व शं. ना. जोशी यांनी त्याला दोषी ठरविल आहे. ( ऐ. प्र. पृ. ५१-५२, पा. रणसं. १. १४५ ) नजीबखानाला धर्मपुत्र म्हणजे, ‘खळी' म्हणून त्याचे संरक्षण करणे व इतर सरदारांना * धोतरवडवी' मंत्र देणे ही याची सत्तास्पर्धेतून निर्माण झालेली दुष्कृत्य प्रसिद्धच आहेत. ( भा. ब. पृ. ३४, ४०-४१) दमाजी गायकवाड -- हा गुजराथेतील सरदार. प्रथम ही ताराबाईच्या बाजूने पेशव्यांविरुद्ध लढला. नंतर पेशव्यांना मिळाला. पानिपतावरून मल्हारराव होळकरानंतर यानेही पळ काढला. समशेर बहाद्दर (इ. स. १७३४--१७६१ ) - बाजीराव व मस्तानी यांचा हा पुत्र. पेशव्यांचा तो मोठा पराक्रमी सरदार होता: पानिपतावर तो जखमी झाला. जाटाच्या मलखांत आल्यावर दोग के तो मरण पावला. ( म. रि. पे. बा. पृ. ४१२)। नाना पुरंदरे -- अंबाजीपंत पुरंद-यांचा पुतण्या. माधवरावाबरोबर हा कर्नाटकच्या स्वारीत होता. विठ्ठल शिवदेव (इ. स. १६७५--१७६७ ) - शाहू छत्रपताना याला सरदार केले. बाजीरावाच्या उत्तरेकडील स्वान्यांत हा होता. यान ग्वाल्हेरचा किल्ला सर केला म्हणून बादशहाने याला विंचूरची जहागा दिली. बादशहाकडून याला मुलुकबहादुर हा किताब मिळाला. निजाम हैदर यांच्यावरील स्वारींतही याने पराक्रम गाजविला. पानिपताहून ९ पळून आला. जनकोजी शिंदे ( मृत्यू १७६१ ) - जयाप्पा शिंदेचा हा पुत्र१७५० त याने अबदालीचा पराभव केला. दत्ताजीबरोबर बुराई। घाटावरील लढाईत हा होता, दत्ताजी पडल्यावरही हा लढत होता:
पान:पाणिपतची बखर.pdf/103
Appearance