॥ - ५ घेतला, त्यांत गोपिकाबाईचा सल्ला घेतला नव्हता असे कांहीं इतिहासकारांचे म्हणणे आहे. गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘या स्वारीची व्यवस्था ठरवितांना नानासाहेबाने आवेशाच्या भरांत किंवा पत्नीच्या शिकवणीमुळे कांहीं गोष्टी ठरविल्या असे प्रवाद बाष्कळ होत.' (म. रि. पे. बा., पृ. ३५३ ) भाऊसाहेबांच्या बखरीत गोपिकाबाईंच्या हस्तक्षेपाचा निर्देश आहे. गोपिकाबाईचा मत्सर अभावितपणे भाऊंच्या पाठवणीला कारणीभूत ठरलेला भाऊसाहेबांच्या बखरींत दाखविला आहे. पृ. ३ विश्वासरावसाहेब यांची रवानगी केली पाहिजे -- भाऊसाहेबांबरोबर विश्वासरावाला पाठविण्यांत गोपिकाबाईचा हात असावा. भाऊंच्या अनिर्वेध सत्तेची भीती गोपिकाबाईंस वाटली म्हणून त्यास पायबंद घालण्यास ही योजना झाली असावी असा विचार प्रा. शेजवलकरांनी मांडला आहे. (पा. १७६१, पृ. १३०) सरदेसायांच्या मते त्यांत कोती कौटुंबिक स्पर्धा नव्हती, विश्वासरावाला स्वारीचा अनुभव मिळावा म्हणून पाठविण्यात आले. ( म. रि. पे. बा., पृ. ३५०, म. रि. मध्य - ३, पृ. १३६-१३७ )| विश्वासराव (इ. स. १७४२-१७६१) - हा नानासाहेब पेशव्यांचा पुत्र. उदगीरच्या मोहीमेंत हा भाऊसाहेबांबरोबर होता. पानिपतवर याला भाऊंबरोबर पाठविण्यात आले. भाऊंनी स्वारीत याला पेशवा म्हणून मान दिलेला दिसतो. दिल्ली काबीज केल्यावर दरबार भरवून भाऊसाहेबाने विश्वासरावाला इतरांकडून नजराणे देवविले. ( म. रि. पे. बी., पृ. ३६६ ) दुर्दैवाने पानिपतच्या संग्रामांत हा गोळी लागून पडला. त्याची पत्नी मात्र परत आली. मल्हारजी होळकर (इ. स. १६९३-१७६६ ) -- हा जातीने बनगर होता. पहिल्या बाजीरावाकडे सामान्य हुजन्या म्हणून राहिलेला मल्हारराव पुढे पराक्रमाने सरदार झाला. बाजीरावाने त्याच्याकडे lळव्यातील चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे काम दिले होते.
पान:पाणिपतची बखर.pdf/102
Appearance