१६ पाणिपती पर नानासाहेब गेले नाहीत. 'परको शत्रु नाहींसा करणे' या ध्येयासाठीं कर्जबाब गौण मानून भाऊसाहेबांना पाठविले. ( पा. रणसंग्राम, पृ. १६४-१६६ ) महादजीपंत पुरंदरे - अंबाजीपंत तात्या पुरंदरे यांचा मुलगा. हा पेशव्यांचा दिवाण होता. नानासाहेबांचा निकटवर्ती सल्लागार होता. कांही दिवस नाराज होऊन घरीं बसला पण परत समजूत पटली. निजामावरील स्वारीं त याने पराक्रम गाजविला म्हणून पेशव्याकडून सरदारी मिळाली. भाऊंच्या स्वभावाचे मर्म याने जाणलें आहे व पेशव्यास सल्ला दिला आहे. भाऊसाहेबांना पानिपतावर हलाखीची स्थिती येण्यापूर्वीच त्यांच्या मदतीस जाण्याचा आग्रह याने पेशव्यास कला होता असे भारतवर्ष शकावलींत आहे. प्रा. शेजवलकर म्हणतात, ‘ अशा गोष्ट पेशव्याने केली असती तर इतिहासातील ती एक नामांकित युद्धशास्त्रीय घडामोड ठरली असती' ( पा. १७६१, पृ. १३६ ) यावरून याचा दूरदर्शीपणा दिसतो. भाऊसाहेबांचे कारभाराचा हावभाव ...... राज्याचा भार त्याजवर आहे . भाऊसाहेबांच्या लष्करी व दिवाणी कारभारांतील कर्तृत्वाचा हा निर्देश आहे. भाऊसाहेबांच्या बखरींतही मल्हारराव होळकरांच्या ताड़। * भाऊसाहेब कर्ते मनुष्य' हे शब्द आहेत. ‘ सदाशिवराव हा राज्याचा जमाबंदी, महसूल व हिशेब या कामांत त्या काळांतील नामांकित अग्रेसर म्हणावा लागेल.' ( पा. १७६१, पृ. ८० )। चिमाजी अप्पा ( मृत्यू १७४०) -- हा थोरल्या बाजीरावाचा धाकटा भाऊ. आपल्या धोरणी स्वभावाने त्याने शाहू महाराजांचे मन जिंकले होते. बाजीरावावर त्याचे प्रेम होते परंतु मस्तानी प्रकरण मात्र त्याला मान्य नव्हते. मस्तानीपासून बाजीरावाला दूर करण्याचा प्रयत्न त्याने केला. वसईची मोहीम चिमाजीने जिंकली तसेच माळवा काबीज केला. गोपिकाबाई साहेब यांणीं अनुमोदन दिलें कीं ... पटदूरला वाटाघाटी झाल्यानंतर भाऊंना पाठविण्याचा निर्णय स्वतः नानासाहेब पेशव्याने
पान:पाणिपतची बखर.pdf/101
Appearance