Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्तावना १. बखरवाङमयाचे विशेष प्राचीन मराठीतील वैभवसंपन्न दालन प्राचीन मराठींत गद्याचा प्रवाह जोमदार होण्यास बखर वाङ्मय कारणीभूत ठरले आहे. बखर वाङमयाने स्वत:चे असे स्वतंत्र स्थान आणि परपरा प्राचीन मराठीत निर्माण केली आहे. प्राचीन मराठी पद्यवाङमयांतील तत्त्वज्ञान पांडित्य वा काव्य यांचे वैभव येथे नसले तरी भावनांची खळबळ आणि विचारांचा आवेश बखर वाङमयांत निराळयाच ढंगाने प्रगट होतो. बखर हा वाङमय प्रकार परकीय की स्वकीय याबाबत मतभेद होतांना दिसतात. बखर ही इतिहाससाधन म्हणून अभ्यसनीय की केवळ ललितकृती म्हणून तिच्याकडे पाहणे आवश्यक, याबद्दलही टीकाकारांत मतांतरे आढळतात; परतु बखरवाङमयाने मराठी सारस्वतांत गद्याचा वैशिठ्यपूर्ण जोरकस प्रवाह निर्माण करून मराठी गद्याला ऐश्वर्य प्राप्त करून दिले, याबाबत मात्र टीकाकारांत एकमत आहे. विशेषतः * सामान्य परिवारू 'साठी लिहिलेले महानुभावांचे साघेसुधे गद्य पाहिल्यावर तर तुलनेने बखरवाङमयांतील डौलदार, लालित्यपूर्ण गद्य मनाला अधिक आकर्पून घेते यांत संशय नाहीं. बखर = व्युत्पत्ती व उपपत्ती बखर या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्या अनुषंगाने वखरीच्या स्वरूपासंबंधी मांडल्या गेलेल्या उपपत्ती यांचे थोडक्यांत दिग्दर्शन करणे उपयुक्त ठरेल. वि. का. राजवाडे यांनी संस्कृत भष् धातूचा अपभ्रंश बख आहे। यावरून बखर हा शब्द आला असावा असे म्हटले आहे. प्रारंभी बखरी तोंडी सांगितल्या जात असाव्या व नंतर त्यांचे लेखन झाले असावे, अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. (ए. प्र. पृ. ३४८ ) फारशी शब्द खबर (स्त्री.) ( अर्थ-बातमी, हकीकत, इतिहास ) यावरून काहीजण बखर