पान:पाकिस्तानचे संकट.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास बनारस शहरांत दंडेली केली अहिंदूंनी; आणि पं० गोविंद वल्लभपंतांनी अपमानकारक नियंत्रणें घातलीं बनारसच्या हिंदूंवर! मौलानांच्या मठीत गेलेल्या महात्माशिष्यांनी हिंदीच्या नांवाने ऊर्दूचे स्वरसंचार चालू दिले! ते मान्य न करणाऱ्या मद्रासमधील हिंदूंना राजाजींनी अहिंसात्मक तुरुंग दाखविला! 'माझें तें माझें, तुझें तें माझ्या काकाचे' हा न्याय अंमलांत येतो व अल्पसंख्याकांचे लाड पुरवितांपुरवितां हिंदूंनाच शेवटी अन्याय होतो, हे मुंबई अॅसेंब्लीच्या काँग्रेसपक्षीय हिंदूंनाहि हळुहळू पटू लागले होते. आमदार सौ० अन्नपूर्णाबाई देशमुख, आमदार बाबुभाई पटेल व नामदार मुरारजी भाई देसाई यांची अॅसेंब्लीतली कांहीं भाषणे या दृष्टीने पाहण्यासारखी आहेत. असा सगळा प्रकार असतां, मुसलमानांनी आपल्या गा-हाण्यांची यादी तयार असावी म्हणून 'पिरपूर' रिपोर्ट तयार केला! या पिरपूर रिपोर्टाची पिरपीर पूर्णपणे पिळपिळीत आहे, हे कोणालाहि सहज कळण्यासारखे आहे ! । . बंगालमधील हिदूंना सतावून सोडण्याची भाषा उघडपणे उच्चारण्याआधीच हक्क मंत्रिमंडळाने हिंदूंना कायद्याच्या आधाराने सतावण्याला सुरुवात केली होती. पंजाबमधील शिकंदरी मंत्रिमंडळाने हिंदूंना बाधक असे काही कायदे पास केल्यामुळे, डॉ० गोकुळचंद नारंग यांच्यासारख्या सात्त्विक प्रवृत्तीच्या गृहस्थांचाहि राग अनावर झाला व त्यांना पंजाबभर तुफानी दौरे काढून हे अन्याय वेशीवर टांगावे लागले ! सिंधप्रांतांत तर मध्यंतरी काही दिवस असे गेले की, त्या काळांत हिंदंचें जीवित व मालमत्ता यांना कोणत्याच प्रकारची सुरक्षितता लाभू शकत नव्हती! डॉ० खानसाहेब यांचे मंत्रिमंडळ सरहद्दप्रांतांत नांदत होते त्या काळांत तेथील हिंदूंच्या अपहरणादि प्रकारांच्या बातम्यांचा जितका सुळसुळाट झाला होता तितका, हे मंत्रिमंडळ अधिकारच्यत झाले तेव्हांपासूनच्या काळांत झालेला नाही! तात्पर्य असे की, मौलाना अझाद यांनी केलेले भविष्य मुसलमान प्रांतांनी तंतोतंत खरे करून दाखविलें! हिंदु प्रांतांत तें खरें होणे शक्य नव्हतेंच! मुसलमान प्रांतांतल्या अत्याचारांचे व अन्यायांचे समर्थन व्हावे म्हणूनच