पान:पाकिस्तानचे संकट.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- पाकिस्तानचे संकट Muslim majority. If the Muslims did not recognise this great step, they were not fit to live. There would now be nine Hindu provinces against five Muslim provinces and whatever treatment Hindus accorded in the nine provinces, Muslims would accord the same treatment to Hindus in the five provinces. Was not this a great gain ? Was not a new weapon gained for the assertion of Muslim. rights ?* (लखनौचा करार करून मुसलमानांनी आपले हितसंबंध विकून-टिकून घालवून टाकले होते! गेल्या मार्च महिन्यांत दिल्लीस झालेल्या वाटाघाटींतून ज्या सूचना पुढे आल्या त्यांच्यामुळे, भारतीय मुसलमानांच्या खऱ्या हक्कांना मान्यता मिळण्याचा मार्ग प्रथम खुला झाला! पंजाब व बंगालमध्ये मुसलमानांचे सध्यां में संख्याधिक्य आहे ते अगदी अल्प आहे. शिरगणतीतल्या कागदपत्रांतला एक निर्जीव आंकडा इतकेंच त्याचे महत्त्व ! दिल्लीच्या सूचनांमुळे मुसलमानांना प्रथमच पांच स्वतंत्र प्रांत मिळत आहेत. यांपैकी निदान तीन प्रांतांत तरी मुसलमानांचे संख्याधिक्य अगदी घसघशीत आहे ! हा उपक्रम किती महत्त्वाचा आहे हे जर मुसलमानांना कळत नसेल तर त्यांनी जगावें तरी कशाला! हिंदूंचे नऊ प्रांत व त्यांच्याविरुद्ध मुसलमानांचे पांच प्रांत अशी घडी आतां बसणार ! नऊ प्रांतांतल्या हिंदूंकड्न मुसलमानांना ज्या त-हेने वागविण्यांत येईल त्याच त-हेनें पांच प्रांतांतले मुसलमान तेथील हिंदूंना वागवितील ! हा एक मोठा फायदाच नव्हे काय ? मुसलमानांच्या हक्कांची हडसूनखडसून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे एक नवें हत्यारच मुसलमानांना मिळाले, असे नव्हे का ? अकरा प्रांतांत प्रधानमंडळे नांदत होती त्या अवधीत काँग्रेसछाप हिंदु मंत्र्यांनी मुसलमानांचा छळ कितीसा केला! मुळीच नाही! उलट या कुन्हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ बनून, हिंदूंचा मात्र मनस्वी छळ केला! *डॉ० आंबेडकरांच्या ग्रंथांत पृ० १०४-०५ वर उद्धृत केलेला उतारा. बंगाल, पंजाब, सिंध, सरहद्दप्रांत व बलुचिस्थान हे पांच मुसलमानप्रांत; सध्यांच्या हिंदुस्थानांतले उरलेले सात प्रांत; कर्नाटक व आंध्र विभक्त होतील या अंदाजाने मौलाना बोलले असावे! ...