पान:पाकिस्तानचे संकट.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) शक्य ते ग्रंथ देऊन मला मदत केली. स०प०कॉलेजच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक श्री०वि०म०कोल्हटकर व सदर कॉलेजच्या प्राध्यापक वर्गांत मान्यता पावलेले माझे मित्र प्रा०रा०वि० ओतूरकर यांचीहि बहुमोल मदत मला झाली आहे. माझे तरुण मित्र देशभक्त वासुदेव बळवंत गोगटे वकील यांनी पुष्कळशा प्रकरणांची हस्तलिखिते वाचून मला काही महत्त्वाच्या सूचनाहि केल्या. माझे दुसरे स्नेही श्री. मो. रा. ढमढेरे वकील यांनीहि एका प्रकरणाचें हस्तलिखित वाचून काही सूचना केल्या. सर्व हस्तलिखित वाचून, त्याची कायद्याच्या दृष्टीने तपासणी करून, तें मंजूर करण्याचे त्रासदायक काम महाराष्ट्राचे प्रसिद्ध पुढारी दे० भ० धर्मवीर अण्णासाहेब भोपटकर यांनी आनंदाने अंगावर घेतले!. या सर्व सज्जनांच्या सौजन्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. श्री० भोपटकर यांनी वेळांत वेळ काढून प्रस्तावनेदाखल दोन शब्द लिहून दिले, त्यामुळे तर मला फार धन्यता वाटत आहे. 2. 'पाकिस्तान' या विषयावर एखादें तरी चांगले पुस्तक प्रत्येक हिंदी नागरिकाने वाचले पाहिजे असे डॉ० आंबेडकर यांनी आपल्या विद्वन्मान्य ग्रंथांत एके ठिकाणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. इंग्रजी न जाणणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांची या दृष्टीने काही तरी सोय व्हावी या हेतूने मी हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे, पुस्तकांत जी इंग्रजी अवतरणे दिली आहेत त्यांचा विस्तृत मराठी गोषवारा बहुतेक सर्व ठिकाणी दिला आहे. 'पाकिस्तान' या विषयाची कल्पना सामान्य महाराष्ट्रीय वाचकाला या पुस्तकामुळे करतां आली तर माझा हेतु साध्य झाला, असें मी समजेन. यापलीकडे कसलेंहि 'चांगलेपण' या पुस्तकांत असेल, असें मी मानीत नाहीं. ‘लोकसंग्रह' मुद्रणालयांतल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुस्तक तांतडीने मुद्रित करण्याच्या कामी श्रम घेतले असल्यामुळे त्या सर्वांचेहि मी मनोभावे आभार मानतो. - या पुस्तकांत जी काही माहिती आढळेल ती लोकांकडून-म्हणजेच इतर ग्रंथकारांकडून मिळविलेली आहे. त्या माहितीचे श्रेय मला घेता येणार नाही. फोडिले भांडार । धन्याचा तो माल । मो तंव हमाल । भारवाही ॥ अशीच या माहितीच्या बाबतींत माझी स्थिति आहे. यापलीकडे फारसें कांहीं ग्रंथांत नाही असे कोणी म्हटले तरी मला त्याचा राग येणार नाहीं! ग्रंथकार म्हणून