पान:पाकिस्तानचे संकट.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजापुढे यावें ही भूमिकाच या लेखनांत नाहीं! एका विषयाचे एका विशिष्ट दृष्टीने विवेचन करावें इतकीच मर्यादित इच्छा या लेखनाला कारणीभूत झालेली आहे ! वाचकांनी अशा मर्यादित अपेक्षेनेंच पुस्तकाकडे पाहावें; म्हणजे, मी त्यांची निराशा केली असे त्यांना वाटणार नाही! हिंदूंनी राज्यघटनेची कोणती तत्त्वें मान्य करावी हे एक प्रकरण पुस्तकांत घालावें असें मनांत होते; पण, पुस्तकाची पाने संकल्पाहून पुष्कळच वाढल्यामुळे व पुस्तक पुरे करून पुण्याबाहेर निघण्याची निकड लागल्यामुळे, तो विषय वगळावा लागला. एकाद्या स्वतंत्र पुस्तकाच्या रूपाने मांडण्याच्या योग्यतेचा 'हिंदुसंघटन' हा विषय फार थोड्या मर्यादेत कोंबावा लागला, हेहि माझ्या ध्यानात आले आहे; पण, प्राप्त परिस्थितीत अधिक विस्ताराने लिहिणे शक्य नव्हते. इतकेंच तूर्त सांगून वाचकांची रजा घेतो. पुणे, दिनांक २३।१२।१९४१ शि० ल० करदीकर