पान:पाकिस्तानचे संकट.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ . पाकिस्तानचे संकट आहे त्या जिल्हयांचा विचार स्वतंत्र रीत्या व्हावयाला पाहिजे होता. पंजाबमधील हिसार, रोहटक, गुरगांव, कर्नाळ, अंबाला, सिमला, कांग्रा, होशियारपूर, जालंदर, लुधियाना, फिरोजपूर, अमृतसर व गुरुदासपूर या १३ जिल्हयांत मुसलमान हे अल्पसंख्य आहेत.* गुरुदासपूर जिल्हयांत मुसलमान सर्वांत जास्त म्हणजे शेकडा ५० आहेत तर कांग्रा जिल्हयांत ते सर्वांत कमी म्हणजे शेकडा फक्त ५ आहेत. पंजाबचे १७ जिल्हे उरले. त्यांत लाहोर जिल्हयांत मुसलमानेतरांचे प्रमाण बरे असले तरी, मुसलमान शेकडा ५९.९ आहेत. सरहहीपलीकडचा बलुची मुलुख एकत्र करून जो जिल्हा बनविण्यात आला आहे त्यांत मुसलमान शे० ९९.९ आहेत आणि ज्या अटकेवर मराठ्यांनी झेंडे नाचविले त्या अटक भागांत मुसलमानांची वस्ती शेकडा ९१ आहे. बंगालमध्ये बरद्वान, बीरभूम, बंकुरा, मिदनापूर, हुगळी, हावरा, हावरा शहर जिल्हा, चोवीस परगणे जिल्हा, डाक्का शहर जिल्हा, कलकत्ता, कलकत्ता उपनगर जिल्हा, खुल्ना, जलपैगुरी, दार्जिलिंग या १४ जिल्ह्यांत मुसलमानेतरांचे संख्याधिक्य आहे. खुल्ना जिल्हयांत मुसलमान शेकडा ४९.३ आहेत तर दार्जिलिंग जिल्हयांत मुसलमान फक्त २.५ आहेत. वर निर्दिष्ट केलेल्या "जिल्हयांशिवाय उरलेल्या १६ जिल्हयांत मुसलमानांची लोकसंख्या इतरांहून अधिक आहे. मुर्शिदाबाद व दिनाजपूर या जिल्ह्यांत हे आधिक्य बेताचंच आहे; कारण, या दोन्ही जिल्हयांतलें मुसलमानवस्तीचे प्रमाण शेकडा ५०.५ आहे. हिंदुबहुसंख्य प्रांतांत मुसलमान लोकसंख्या अल्पप्रमाणांत असली तरी तिला कोणताच धोका नाही, हे मुसलमानांना मनांतून मान्य आहे व सरकारलाहि ती गोष्ट पटत असली पाहिजे. शिवाय, स्वतंत्र मतदारसंघांमुळे कायमचे अल्पसंख्य राहण्यांत व हिंदूंना कायमचे बहुमत देण्यांत या प्रांतांतल्या मुसलमानांना धोका असलाच तर, त्यांनी तो धोका उघड्या डोळ्यांनी पत्करला आहे. त्या प्रांतांत मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिले ते त्यांनी मागितले म्हणून दिले! मुसलमानांच्या थोड्याशा संख्याधिक्यामुळे मुसलमानेतरांना कायमचे अल्पसंख्य ठेवतांना असा कांहींहि प्रकार झालेला नाही. . *Thoughts on Pakistan, p. 355. +Thoughts on Pakistan, p. 356. DE