पान:पाकिस्तानचे संकट.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट मनोवृत्ति हिंदुसमाजाच्या सगळ्या थराथरांतून खेळू लागली तरच हा समाज भविष्यकाळी ऐहिक उत्कर्षाच्या मार्गाला लागू शकेल व त्या मार्गावर टिकू शकेल ! या प्रवृत्तीची जोपासना व उपासना करण्याऐवजी हिंदु माणसें राजकारणाचें अध्यात्मीकरण व उदात्तीकरण यांची भाषा बोलू लागतात हा हिंदूंच्या ऐहिक उत्कर्षाला होत असलेला अपशकुनच होय ! जातिनिर्णयाने हिंदूंवर कोणते अन्याय झाले व त्या निर्णयामुळे मुसलमानांची जागृतिस्वप्ने संपूर्णतया कशी सफल झाली याचे विवेचन डॉ० आंबेडकर यांनी थोडक्यांत पण मार्मिकपणानें केलें आहे (पृ. ९७-१०६). जातिनिर्णयामळे जातीय प्रश्नाच्या अल्पार्थक स्वरूपावर (lesser intent) व स्थूलार्थक स्वरूपावर (greater intent ) कोणते परिणाम घडले हे डॉ. आंबेडकरांच्या मूलग्राही विवेचनाचे सार लक्षात आल्याने चांगले पटेल. प्रत्येक विधिमंडळांत हिंदु व मुसलमान यांच्या प्रतिनिधींची संख्या किती असावयाची व या प्रतिनिधींची निवड ज्या मतदारसंघांनी करावयाची ते मतदारसंघ कोणत्या स्वरूपाचे असावयाचे या प्रश्नांचा अंतर्भाव जातीय प्रश्नाचे 'अल्पार्थक स्वरूप' या शब्दप्रयोगांत होत असल्याचे सांगून डॉ. आंबेडकर यांनी पुढील उद्गार काढिले आहेत: The award gave the Muslims all that they wanted without caring for the Hindu opposition.* (हिंदूंच्या विरोधाची बिलकुल पर्वा न करतां जातिनिर्णयाने मुसलमानांचे 2. सर्व म्हणणे मान्य केलें.) मोर्ले-मिंटो सुधारणांच्या वेळी मुसलमानांनी मिळ विलेले स्वतंत्र मतदारसंघ कायम राहिले, ज्या प्रांतांतून मसलमान वस्तीचें प्रमाण कमी आहे अशा मुंबई, मद्रास, संयक्तप्रांत, वगैरे प्रांतांतून मुसलमानांना जें जादा प्रतिनिधित्व (Weightage) मिळाले होतें तें कायम राहिले आणि बिहार, ओरिसा वगैरे जे नवे हिंदुप्रधान प्रांत निर्माण झाले त्यांनाहि तें तत्त्व लावण्यांत आले. लखनौ-करारान्वयें देवाणघेवाणीच्या तत्त्वानुसार बहुसंख्य मुसलमान वस्तीच्या पंजाब व बंगाल प्रांतांमध्ये हिंदूंना

  • Thoughts on Pakistan, p. 98.