पान:पाकिस्तानचे संकट.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ७३ । भाणांतिक उपोषणाचें पिस्तुल हिंदुसमाजावर रोखून व त्या 'अहिंसक' शस्त्राचे बार साऱ्या जगभर ऐक जातील याची दक्षता घेऊन, गांधीजींनी जो पुणेकरार घडवून आणला त्याने शेवटी कोणाचेंच समाधान झाले नाही ! पूर्वास्पृष्टहि त्या कराराविरुद्ध जळफळत आहेत आणि बंगालमधील सवर्ण हिंदु तर त्या कराराची आठवण झाली की नुसते रागाने लाल होत आहेत ! गेल्या युद्धांत हिंदुस्थानने साम्राज्याला मनोभावें मदत केली तिचे बक्षिस म्हणून जालियनवाला बागेतले हत्याकांड पदरांत पडलें ही हिंदु राष्ट्रभक्तांची तक्रार अगदी रास्त आहे. पण, त्याबरोबरच त्यांनी तितक्याच त्वेषाने हीहि तक्रार केली पाहिजे की, मुसलमानांच्या मोहबतीखातर खिलाफतीच्या चळवळीप्रीत्यर्थ हिदूंनी सर्व प्रकारे जी मदत केली तिचा मोबदला म्हणून मुसलमानांनी त्यांना मोपला प्रकरणांतील हत्याकांडाचे खरपूस बक्षिस तर दिलेच; पण त्याशिवाय, काळजाला कट्यारीसारखें हरघडी रुतत राहणारें जातिनिर्णयरूपी बक्षिसहि त्यांनीच हिंदूंना दिलें! कानाला गोड लागणारी वचनें कृतीचा प्रसंग येतांच इंग्रजांकड़न विसरली जातात व या वचनभंगामुळे भारतीयांची हृदये कायमची विद्ध होतात ही हिंदु राष्ट्रभक्तांची तक्रार खरी आहे. पण, ती एकटया इंग्रजांविरुद्ध करून काय होणार! इंग्रजांनीं 'भाई' म्हणून तरी हिंदूंचा विश्वासघात केलेला नाहीं! भरल्यापोटी व्याख्यान देतांना करावयाची शाब्दिक आतषबाजी म्हणून राजकारणाचें अध्यात्मीकरण आणि उदात्तीकरण' वगैरे शब्दप्रयोग हिंदूंनी खुशाल, अवश्य वापरावे! पण, प्रत्यक्ष राजकारणाचा व्यवहार करावयाला बसण्यापूर्वी त्यांनी हे सारे शब्दप्रयोग बाटलीत कोंबून टाकावे व त्या बाटलीवर — Poison' (विष) ही ठळक चिठी त्यांनी लालभडक शाईने लिहून लावावी! जगांतील राष्ट्र व भोंवतालचे समाज पाशवी मनोरचनेंतून (Animalism) अद्याप पुरतेपणी बाहेरहि पडावयाचे आहेत; तोच हिंदुसमाजाने फाजील बुद्धिवादापर्यंत (Rationalism) मजल मारली यांतच हिंदुसमाजाच्या ऐहिक अपकर्षाची बीजे सांठलेली आहेत ! साऱ्या अहिंदुसमाजांत भिनलेल्या पाशवी प्रवृत्तीइतपत तरी पाशवी