पान:पाकिस्तानचे संकट.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ पाकिस्तानचे संकट जमा होत असल्यामुळे, त्यांचे वर्णन विस्ताराने करीत न बसतां, जातीय निर्णयाच्या रूपाने मुसलमानांच्या सगळ्या अतिरिक्त मागण्या त्यांच्या पदरांत कशा पडल्या एवढेच सांगन पुढील विवेचनाकडे वळणें अवश्य आहे. ___सायमन कमिशनच्या रिपोर्टाची व गोलमेज परिषदेंत झालेल्या चर्चेची छाननी केली तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते. जातवारीच्या मतदारसंघांबद्दल प्रत्येकानें नापसंति दर्शवावी व प्रत्येकाने त्या मतदारसंघांपुढे निमूटपणे, नाइलाज म्हणून मान वांकवावी असें एकसारखें घडत गेलें. प्रांतविभागणी, मतदारांची व मतदारसंघांची वाढ, प्रांतांतल्या लोकसंख्येतली जातवारी पाहून झालेली जागांची वाटणी इत्यादि सर्व गोष्टी पूर्वीच कोणी ना कोणी ब्रिटिश मुत्सद्यांना व मुसलमानांना इष्ट अशा प्रकारे मान्य केल्या होत्या त्या जातीय निर्णयानें वज्रलेप झाल्या ! जात, पंथ, वर्ग, धर्म, हितसंबंध (Interest) इत्यादि शब्दांनीं निर्दिष्ट होणारे लोकसमूह दोरीसूदपणाने विभागलेले नसतात, अशा गोष्टी दृष्टीसमोर ठेवून समाजाची उभी-आडवी विभागणी करीत गेल्यास समाजाची शुद्ध चाळण बनेल इत्यादि महत्त्वाच्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष होऊन, स्वतंत्र मतदारसंघांची नुसती खैरात झाली! ज्यांनी मागितले त्यांना तर हे मतदारसंघ मिळालेच; पण, ते न मागणाऱ्या भगिनीवर्गावरहि ते लादण्यांत आले ! । जमलेल्या जातीय पुढाऱ्यांत मतैक्य होत नाही हे पाहून मॅक्डोनल्ड साहेबांनी हा वादग्रस्त प्रश्न निकालांत काढण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. 'तुम्ही आपसांत सहमत होत नसाल तर लखनौ करारांतील तत्त्वांचीच परिस्थित्यनुरूप अंमलबजावणी होईल' असें ब्रिटिश पंतप्रधानांनी ठासून सांगितले असते तर, लंडनमध्ये गोळा झालेले सारे दाढदीक्षित ताड्कन् शुद्धीवर आले असते! पण, राजकारणी पुरुष व्यवहार करू लागले की, त्यांच्या उदात्त तत्त्वांचा नुसता इतिहास बनतो आणि त्यांच्या प्रत्यक्ष आचारावर स्वार्थाचीच घनदाट छाया पडते हा मोर्लेच्या वेळेपासून आलेला अनुभवच याहि वेळी पुनरुक्त झाला. त्यांनी दिलेला जातिनिर्णय सर्वच हिंदूंच्या दृष्टीने घातकी ठरला. बंगाली हिंदूंच्या दृष्टीने तर तो फारच घातकी ठरला! दुर्दैवी सवर्ण बंगाली हिंदूंचे दैव असें खडतर की, मॅक्डोनल्डसाहेबांनी केलेल्या या अन्यायांत भर घालण्याला गांधीजी कारणीभूत झाले!