पान:पाकिस्तानचे संकट.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ७१ आहे. १९२०-४१ हा काळ अलीकडचा असल्यामुळे, या काळांतल्या घडामोडींचे स्मरण अजून पुसट झालेले नाही. त्यामुळे या घडामोडींचा वृत्तांत विस्ताराने सांगण्याचे कारण नाहीं. १९२७ साली नेमण्यांत आलेल्या सायमन कमिशनवर टाकण्यांत आलेला बहिष्कार, या कमिशनच्या सभासदांपुढे झालेल्या एकतर्फी साक्षी, पहिल्या गोलमेज परिषदेची आशादायक सुरुवात, १९३० ची सत्याग्रहाची चळवळ, गांधी-आयर्विन करार, दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजींची उपस्थिति, तेथे झालेलें हिंदी पुढाऱ्यांमधील भेदांचे ओंगळ प्रदर्शन, १९३२ ची सत्याग्रहाची दुसरी चळवळ व दडपशाही, मॅक्डोनल्डचा जातीय निर्णय, गांधीजींचा उपवास व त्यांतून निघालेला पुणेकरार, जातीय निर्णयाचा निषेध करण्याच्या बाबतींतली काँग्रेसची शकारी वृत्ति, अणे-मालवीयजींनी काढलेला काँग्रेस राष्ट्रीय पक्ष व मराठी मुलुखांत निघालेला लोकशाही स्वराज्य पक्ष, १९३३-३४ साली काँग्रेसने लढविलेल्या दिल्ली अॅसेंब्लीच्या निवडणुकी, तेथून काँग्रेसच्या धोरणाला लागलेले नवे वळण, १९३६ सालच्या अखेरीस काँग्रेसनें प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकी जिंकण्यासाठी केलेली उठावणी, १९३७ च्या आरंभी या निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले यश, आश्वासन मागणीचा हट्ट व हंगामी मंत्रिमंडळांची स्थापना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना लाभलेलें संचारस्वातंत्र्य व प्रचारस्वातंत्र्य, काँग्रेसच्या मंत्रिमंडळांमार्फत चाललेला प्रांतिक कारभार, अकरणरूप धोरणामुळे सांठत गेलेल्या काँग्रेसच्या लोकप्रियतेला प्रांतिक कारभारांतील चुकांमुळे लागलेली ओहोटी, बंगाल-सिंध वगैरे प्रांतांतील मंत्रिमंडळांचे हिंदुविरोधी धोरण व काँग्रेस मंत्रिमंडळांचे मुसलमानधार्जिणे धोरण, बॅ. सावरकरांच्या तेजस्वी कर्तृत्वामुळे व भोवतालच्या परिस्थितीमुळे हिंदुमहासभेची वाढत चाललेली लोकप्रियता, महायुद्धाची सुरुवात व काँग्रेस मंत्रिमंडळांचे राजिनामे, मुस्लीमलीगने साजरा केलेला 'मुक्ति-दिन', काँग्रेसच्या मागण्यांना उत्तर देतांना ब्रिटिश मुत्सद्यांनी एकमुखी मागणीवर दिलेला भर, काँग्रेसचा पुणे ठराव व युद्धविरोधी घोषणा करून तुरुंगांत जाण्याची चळवळ, डाक्का, अहमदाबाद, मुंबई वगैरे ठिकाणच्या दंग्यांत हिंदंचे झालेले हाल, मुस्लीमलीगच्या चढेल मागण्यांची बेसुमार वाढ, वरिष्ठ सरकारच्या कार्यकारी मंडळाची वाढ वगैरे गोष्टी अगदी ताज्या इतिहासांत