पान:पाकिस्तानचे संकट.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० पाकिस्तानचे संकट . मधील हिंदूंना झालेला पश्चात्ताप, १९३२ साली मुंबईस झालेल्या हिंदु. मुसलमान, ख्रिस्ती वगैरे पुढाऱ्यांमधील वाटाघाटी इत्यादि घटना निर्देशितां येतील. संयुक्त मतदानपद्धति म्हणजेच राष्ट्रीयत्व आणि सर्वस्व, या प्रचलित भावनेचा फायदा घेण्याचेहि प्रयत्न सुरू झाले. १८-४-१९३१ रोजी लखनौ येथे सर अल्ली इमाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मुसलमानांच्या राष्ट्रीय परिषदेंत पास झालेले ठराव, १९३२च्या पावसाळ्यांत बंगाल कौन्सिलमध्ये पास झालेला ठराव, इत्यादि गोष्टी या दृष्टीने तपासून पाहिल्या पाहिजेत. अशा उपक्रमांची उठावणी मुसलमानांचे संख्याधिक्य असलेल्या प्रांतांतूनच कां होते हा प्रश्न विचारांत घेण्यासारखा आहे. मुंबई इलाख्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांतून संयुक्त मतदानपद्धति अगदी अल्पांशाने सुरू करण्याचा प्रश्न निघतांच अॅसेंब्लींतील मुसलमान सभासदांनी आकाशपाताळ कसें एक केले हे ज्यांच्या लक्षात असेल त्यांना हे सहज समजेल की, मुसलमानांची बहुसंख्या असलेल्या प्रांतांतून मुस्लीम मतदार आतां चांगले 'तयार' झालेले असल्यामुळे, संयुक्त मतदानपद्धति तेथील मुसलमानांना मानवणारी आहे. नेहरू-रिपोर्ट १९२८ साली लिहिला गेला; त्या वेळी हे मतदार इतके तयार झालेले नसावेत; तरीसुद्धा, संयुक्त मतदान पद्धतीमुळे मुसलमान मतदारांनी मैमेनसिंग, चितगांग व जेसोर या जिल्हयांतल्या बोर्ड निवडणुकीच्या वेळी हिंदु उमेदवारांना कसें धुळीला मिळविले याचे वर्णन नेहरू रिपोर्टात केलेले आहे ! * हे सर्व ओळखून हिंदूंनी निष्कर्ष असा काढला पाहिजे की, - अमुक गोष्टींत सर्वस्व व राष्ट्रीयत्व भरलेले आहे अशी कायम ठशाची भावना त्यांनी करून घेतली की, आपला जातिस्वार्थ साधण्यासाठी त्या भावनेचा उपयोग करून घेण्याला मुसलमान टपून बसलेलेच आहेत ! हिंदूंचे हित व इतर समाजांना धारवाडी काट्याने मिळणारा न्याय म्हणजेच सर्वस्व आणि म्हणजेच राष्ट्रीयत्व असा ठाम सिद्धांत मनांत बिंबवून हिंदु वागतील तरच सर्व प्रश्न त्यांना समाधानकारक रीतीने सोडवितां येतील. ही कसोटी लावून आतां १९३२ च्या जातीय निर्णयाचा विचार करणे अवश्य * All Parties Conference Report 1928, p. 47.