पान:पाकिस्तानचे संकट.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास देशाबद्दलचा विचार मनांत आणून, माणसांनी सूर्याला नमस्कार घातले किंवा वडापिपळाला प्रदक्षिणा घातल्या तरी : त्याहि गोष्टी कौतुकार्ह समजाव्या अशी ज्या देशांतल्या लोकांची राजकारणी झोपाळूपणाची परंपरासिद्ध स्थिति, त्या देशांत इतका निर्भयपणा ज्या एका व्यक्तीच्या प्रभावामुळे इतक्या अल्प काळांत निर्माण झाला त्या गांधीजींना लोक धन्यवाद __देऊ लागले, हे बरोबरच झाले. १९२२ च्या मार्च महिन्यांत गांधीजीच पकडले गेले. हिंदुस्थान हा स्वतंत्र व लोकसत्ताक राज्यपद्धतीचा देश आहे अशी घोषणा करण्यांत यावी अशी भाषा अल्लीबंधुंच्या तोंडी १९२२ साल उजाडेपर्यंत खेळत होती. मुसलमान व काँग्रेस यांची जूट फोडली पाहिजे हे. सरकारने ओळखले आणि सेव्हर्सच्या तहाची फेरतपासणी कोणत्या रीतीने व्हावी याबद्दलचें आपले मत व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी इंग्लिश मुत्सद्यांना कळविलें. १९२३ च्या जुलैमध्ये युरोपांत लॉसेन परिषद होऊन तुर्कस्थानचा स्वतंत्र दर्जा मान्य करण्यांत आला. केमाल पाशाचा अधिकार तुर्कस्थानांत सुरू झाला व खिलाफतीचा निकाल त्यानेच लावला. याच साली इंग्लंड व अफगाणिस्थान यांच्या दरम्यान तह झाला व त्यामुळे सरहद्दीवरची गडबडहि मंदावली. इस्लामी जगांतल्या घडामोडींना हे नवे वळण लागतांच, हिंदी मुसलमानांचा सरकारपाशी असलेला तंटा संपला व या तंटयाला तेज चढावें या हेतूने त्यांनी काँग्रेसनेत्यांशी जो सलोखा केला होता तोहि त्यांना अनवश्यक वाटू लागला. या अल्पकाळांत मुसलमानांना एक गोष्ट कळली व ती कळण्याला काँग्रेसमधील हिंदूच कारणीभूत झाले. हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याचा ध्यास धरणाऱ्या या हिंदु पुढाऱ्यांना या ऐक्याविना स्वराज्यप्राप्ति अशक्य वाटते हे त्यांनी ओळखलें ! स्वराज्याला हपापलेले हिंदु पुढारी ऐक्य टिकावे म्हणून किती लाचारपणाने वागतात याचाहि अनुभव त्यांना मोपला प्रकरणासारख्या प्रकरणांतून मिळाला. स्वराज्यपक्ष कौन्सिलांत जाऊन बसला तेव्हांपासून घटना दुरुस्त होण्याची भाषा वारंवार सुरू झाल्यामुळे, राजकीय हक्कांचा पुढचा हप्ता लौकरच पदरांत पडणार हे त्यांना नक्की कळून चुकलें ! सर