पान:पाकिस्तानचे संकट.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- पाकिस्तानचे संकट || कारचा रोष टाळून हिंदूंना भीति दाखवण्यांत मोठासा धोका नाही, त्यामुळे आपलें महत्त्व वाढण्याचीच शक्यता जास्त आहे हे ओळखून त्यांनी तो उपक्रमहि सुरू केला. गांधीजींनी मधूनमधून उपासतापास करावे व आपला पश्चात्ताप चावडीवर मांडावा हाहि राजकारणातला एक नित्याचा प्रघात होऊन बसला. गांधींनी उपास केला की हिंदुमुसलमानांच्या ऐक्याची बोलणी हटकून सुरू व्हावयाचीच ! १९३२ सालच्या जातीय निर्णयाने (Communal Award) मुसलमानांनी आपल्या चौदा मागण्या भरमाप पदरांत पाडून घेतल्या असें हिंदुमहासभा म्हणते व डॉ. आंबेडकर यांनीहि आपल्या पुस्तकांत (पृ० ९८ वर) ही गोष्ट मान्य केलेली आहे. जातिनिर्णयांत समाविष्ट झालेल्या बहुतेक अनिष्ट गोष्टींना ऐक्यासाठी हपापलेल्या काँग्रेसवादी हिंदूंनीं मध्यंतरीच्या या काळांत केव्हां ना केव्हां तरी आगाऊ मान्यता देऊन ठेविलेली होती, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. १९२३ साली कै० दासबाबू यांनी बंगालमधील मुसलमानांबरोबर बंगालपुरता एक करार केला होता व स्वतंत्रवृत्तीच्या हिंदूंना त्याबद्दलची नापसंती दर्शवावी लागली. सिंधला लागू असणारा असाच एक करार तयार झाला होता व हिंदूंनी त्याबद्दलची नापसंति दर्शविली ही गोष्ट १९२८ साली प्रसिद्ध झालेल्या नेहरू-रिपोर्टात नमूद झालेली आहे.* १९२४ साली मौ० महंमदअल्ली यांनी स्वामी श्रद्धानंदजी यांच्या सहकार्याने दिल्लीस एक ऐक्यपरिषद बोलावली होती. १९२५च्या जानेवारी महिन्यांत गांधीजींच्या अध्यक्षतेखाली अशीच एक कमिटी नेमण्यात आली होती. पं० मोतिलाल नेहरू हे या कमिटीचे चिटणीस होते. अशा कमिटयांतून निष्पन्न तर कांहींच झाले नाही. पण, या ऐक्योत्सुक हिंदूंनी जी औदार्याची भाषा वापरली तिचा मात्र मुसलमानांनी पुरा फायदा करून घेतला. ‘मिळेल तें खिशांत टाका व उरलेल्यासाठी झगडत राहा' हा उपदेश लो० टिळकांनी सरकारपाशी चाललेल्या राष्ट्रीय झगड्याला उद्देशून केला होता. इतरांनी तो उपदेश कृतींत उतरविला असो वा नसो, हिंदी मुसलमानांनी मात्र तो दुहेरी अर्थाने कृतींत आणिला आहे. हिंदु व इंग्रज राज्यकर्ते या *All Parties Conference Report 1928, p. 68.