पान:पाकिस्तानचे संकट.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांची बुद्धिमता, विद्वत्ता व अभ्यासु वृत्ति यांबद्दल आहे ! व याची साक्ष त्यांच्या रंथांतून जागजागी अनुभवास येतेहि! डॉ. आंबेडकर यांची भिन्न भिन्न प्रमेये व सिद्धांत यांचा सूक्ष्म विचार करून श्री० करंदीकरांनी ती कशी भ्रामक आहेत याचा विचार या ग्रंथाच्या आठव्या, नवव्या, व दहाव्या प्रकरणांमध्ये मार्मिकपणाने केलेला आहे. “हिंदुसंघटनेचा महामंत्र" हे शेवटले तेरावें प्रकरण तर फारच सरस उतरले आहे, असे म्हटल्यावाचून राहवत नाही! त्यांत हिंदुसंघटनेचा महामंत्र म्हणून जो देण्यांत आला आहे, तो प्रत्येक हिंदुमहासभावाद्यानेच नव्हे, तर प्रत्येक हिंदूनेंहि स्वतःचे ठायीं बाणून घेऊन तो अंमलांत आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास पाकिस्तानच्या संकटास यशस्वीपणानें तोंड देण्याइतका हिंदुसमाज समर्थ व प्रभावी निःसंशय बनेल ! पाकिस्तान हा शब्द व त्यांत गर्भित असलेली कल्पना, त्या कल्पनेचे असत्यत्व व तिचे खंडण, हिंदुस्थानच्या प्रांतांची अडाणी मांडणी, मुसलमानांनी मांडलेल्या अनेकविध पाकिस्तानच्या योजना व मुसलमानांच्या हृदयपालटाची आवश्यकता, यासंबंधाने पहिल्या, दुसन्या, सातव्या व 'अकराव्या प्रकरणांत ऊहापोह केलेला आहे. आणि बाराव्या प्रकरणांत आतां वास्तविकपणे काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री झालेली असून, काँग्रेसचे पुढारी हिंदी राजकारणाचा कसा विनाकारण खेळखंडोबा करति आहेत, याबद्दल विवेचन केलेले आहे ! एकंदरीत, 'पाकिस्तान ' या विषयावरील हा रंथ हिंदी राजकारणाच्या अभ्यासूला संग्राह्य असा झाला आहे. असा हा सुंदर ग्रंथ निर्माण केल्याबद्दल श्री० करंदीकरांचे हार्दिक अभिनंदन करून हे दोन शब्द पुरे करतो. पूणे, दिनांक २३।१२।१९४१ ल० ब० भोपटकर