पान:पाकिस्तानचे संकट.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. दे०भ०धर्मवीर भोपटकर यांनी लिहिलेले .... दोन प्रास्ताविक शब्द __माझे मित्र थी०शि०लकरंदीकर यांनी लिहिलेल्या "पाकिस्तानचे संकट " या ग्रंथाची हस्तलिखितें मी समग्र लक्षपूर्वक वाचिलेली आहेत; व त्यावरून मला लिहिण्यास मोठा आनंद वाटतो की, या ग्रंथाने खरोखरच महाराष्ट्रीय राजकीय साहित्यांत उत्तम भर टाकलेली आहे! आजकाल पाकिस्तान हा राजकीय क्षेत्रांतील एक वादग्रस्त विषयच होऊन बसलेला आहे. मुसलमान समाजाने आपली अशी समजूत करून घेतलेली दिसते की, हिंदुस्थानांत जर पाकिस्तान स्थापन करण्यांत आले, तर त्या समाजाचा उत्कर्ष झाल्याविना खचित राहणार नाही. इतर पुष्कळांची अशी समजूत की, पाकिस्तानचे खूळ मुख्यतः मुस्लीम लीगनें, व त्यांतल्या त्यांत जनाब जीनांनी अलीकडेच निर्माण केलेले आहे. हे वरील दोन्ही समज कसे चुकीचे आहेत, हे करंदीकरांनी या ग्रंथांत अभ्यासपूर्वक आंकड्यानिशीं व ऐतिहासिक दाखले देऊन सप्रमाण सिद्ध केलेले आहे. यासंबंधाची प्रकरणें तीन, चार व पांच वाचकांनी लक्षपूर्वक वाचल्यास त्यांना कळून येईल की, पाकिस्तानची कल्पना वाटते तशी नवोदित नसून, सन १८५७ सालापासून तिचे बीजारोपण होऊन, ती आता फक्त स्पष्ट स्वरूपांत जगापुढे मांडण्यांत आलेली आहे, इतकेंच काय ते! या विषयावर डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाने बरीच खळबळ उडवून दिली आहे, यांत शंका नाही. डॉ० आंबेडकर यांची ख्याति